रतन टाटांना आसामचा सर्वोच्च राज्य नागरी पुरस्कार प्रदान

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी उद्योगपती रतन टाटा यांना असम वैभव सर्वोच्च राज्य नागरी पुरस्कार प्रदान केला आहे.
Ratan Tata
Ratan TataDainik Gomantak
Published on
Updated on

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या घरी जाऊन राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'आसाम वैभव' देऊन सन्मानित केले. रतन टाटा (Ratan Tata) यांना यापूर्वी 24 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा सन्मान देण्यात येणार होता. मात्र, वैयक्तिक कारणामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

दरम्यान, आसाम सरकारने आपल्या सर्वोच्च सन्मानासाठी विविध क्षेत्रातील 19 जणांची निवड केली होती. यामध्ये कोरोना-19 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपासून ते उद्योजकापर्यंत होते. उद्योगपती रतन टाटा यांना राज्याच्या नवनिर्मित सर्वोच्च नागरी पुरस्कार 'आसाम वैभव' ने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आणखी पाच जणांना 'आसाम सौरव' आणि 12 जणांना 'आसाम गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Ratan Tata
Indian Army: चन्निरा बन्सी पोनप्पा बनले डेप्यूटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ

पुढील वर्षीपासून नागरिकांच्या शिफारशींवरुन पुरस्कार देण्यात येणार

या पुरस्कारांबाबतच्या नियमानुसार आसाम वैभव हा सर्वोच्च सन्मान दरवर्षी केवळ एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे. त्याचबरोबर असम सौरव तीन जणांना आणि आसाम गौरव 15 जणांना देण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण 19 जणांचा गौरव करण्यात येणार आहे. मात्र, यंदा काही कारणांमुळे या संख्येत थोडासा बदल झाला आहे.

पुढील वर्षीपासून लोकांच्या शिफारशींच्या आधारे हे पुरस्कार दिले जातील. यासाठी राज्य सरकार लवकरच एक ऑनलाइन पोर्टल सुरु करणार आहे, जिथे लोक त्यांच्या आवडीच्या लोकांची नावे देऊ शकतील. दरवर्षी 2 डिसेंबर रोजी आसाम दिनानिमित्त हे सन्मान प्रदान केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com