Plane arrives in Delhi from Romania with 219 Indians Dainik Gomantak
देश

युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांसह विमान रोमानियाहून दिल्लीत दाखल

Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एक विशेष विमान शुक्रवारी (आज) दिल्लीत पोहोचले आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या 219 भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एक विशेष विमान शुक्रवारी (आज) दिल्लीत पोहोचले आहे. (Plane arrives in Delhi from Romania with 219 Indians stranded in Ukraine)

अंतर्गत इंडिगोचे विशेष विमान गुरुवारी रोमानियाची (Romania) राजधानी बुखारेस्ट (Bucharest) येथून निघाले होते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी भारतीय नागरिकांचे विमानतळावरती स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. परराष्ट्र मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निकट समन्वयाने, भारतीय विद्यार्थ्यांना वेगाने भारतात परत आणण्यासाठी सर्व स्थरावरील प्रयत्न सुरु आहेत.

हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग निर्वासन कार्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि पर्यवेक्षण करण्यासाठी युक्रेनला लागून असलेल्याचं देशांमध्ये गेले आहेत. भारतीय नागरी विमाने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नियमितपणे आणत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) सांगितले की, पुढील दोन दिवसांत 7,400 हून अधिक लोकांना विशेष विमानांद्वारे आणले जाण्यार आहे. पुढे, शुक्रवारी 3,500 लोकांना आणि 5 मार्च रोजी 3900 हून अधिक लोकांना परत आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मॉस्कोने युक्रेनचे तुटलेले प्रदेश डोनेस्तक आणि लुहान्स्क स्वतंत्र संस्था म्हणून ओळखल्याच्या तीन दिवसांनंतर, 24 फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे.

यूके, अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांचा निषेध केला आणि मॉस्कोवरती निर्बंध लादले आहेत. या देशांनी युक्रेनला रशियाशी लढण्यासाठी लष्करी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

यूएस, कॅनडा आणि युरोपियन मित्र देशांनी आंतरबँक मेसेजिंग सिस्टीम, SWIFT मधून प्रमुख रशियन बँका काढून टाकण्यास सहमती दर्शविली आहे, म्हणजेच रशियन बँका रशियाच्या सीमेपलीकडे असलेल्या बँकांशी सुरक्षितपणे संवाद साधू शकणार नाही. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध विशेष आर्थिक उपाययोजनांच्या आदेशावरती स्वाक्षरीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

SCROLL FOR NEXT