Indian Cricketer Retirement Dainik Gomantak
देश

Indian Cricketer Retirement: क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताच्या 'या' खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा

Piyush Chawla Retirement: भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा स्टार फिरकीपटू पियुष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला.

Sameer Amunekar

भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला, त्यानंतर टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. आता २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या पियुष चावलानं निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

भारतासाठी दोन विश्वचषक जिंकले

पियुष चावलाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर, आता या खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. भारतासाठी खेळण्यापासून ते २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होण्यापर्यंत, हा अद्भुत प्रवास होता.

माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आयपीएल फ्रँचायझींचे मनापासून आभार. पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स. आयपीएल माझ्या कारकिर्दीतील एक खास अध्याय आहे. मी माझे प्रशिक्षक केके गौतम आणि दिवंगत पंकज सारस्वत यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला क्रिकेटपटू म्हणून घडवले, असं पियुष चावलाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

२००६ मध्ये कसोटी पदार्पण केले

पियुष चावलाने २००६ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. परंतु खराब फॉर्ममुळे तो संघातून येत-जात राहिला आणि त्याला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्याने टीम इंडियासाठी ३ कसोटी सामन्यांमध्ये ७ बळी घेतले. याशिवाय, त्याने २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४ बळी आहेत.

आयपीएलमध्ये १९२ विकेट्स

पीयुष चावलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण १९२ विकेट्स घेतल्या. गेल्या हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

SCROLL FOR NEXT