crime news Dainik Gomantak
देश

UP Crime News: बायकोचा खून करून नवरा झोपला मृतदेहाजवळ, उत्तर प्रदेशमधील घटननेने खळबळ

मद्यधुंद व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या केली व त्यानंतर तो त्याच मृतदेहाजवळ झोपला.

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधून खूनाची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या केली व त्यानंतर तो त्याच मृतदेहाजवळ झोपला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून आरोपी पतीला अटक केलीय.

राम प्यारे भुईया (वय 50, रा. कोरची टोला) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी तो दारूच्या नशेत घरी पोहोचला आणि त्याने पत्नी ललिता देवीसोबत कशावरून तरी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीच्या डोक्यात काठीने अनेक वार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा केल्यानंतर तो पत्नीच्या मृतदेहाजवळ झोपला. कसेबसे शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि हत्येत वापरलेला काठी जप्त केली. तसेच आरोपी पतीला अटक केली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर याबाबत अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

मागील महिन्यात महाराष्ट्रात पालघरमधून खुनाची अशीच एक खळबळजनक घटना समोर आली होती. येथे एका व्यक्तीने आधी पत्नीची हत्या केली. त्यानंतर कामावर गेला. व तेथून थेट पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. हे प्रकरण नालासोपारा परिसरातील आहे.

26 वर्षीय प्रभू विश्वकर्मा यांचा विवाह 25 वर्षीय अनितासोबत सात वर्षांपूर्वी झाला होता. दोघेही नालासोपारा परिसरात राहत होते. प्रभू हे अनेकदा कामानिमित्त मालाडला येत-जात होते. दरम्यान, त्याच्या पत्नीचे काही व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याचे त्याला समजले. याबाबत त्यांनी विचारणा केली असता अनिताने नकार दिला.

असे असूनही विश्वकर्माला त्याच्या चारित्र्यावर संशय आला. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर त्याने पत्नीचा उशीने गळा दाबून खून केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Professional League 2024: जीनो क्लबचा पाचवा विजय! कुठ्ठाळी व्हिलेजर्सला नमवून पटकावले अग्रस्थान

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Ranji Trophy 2024: गोव्याच्या फलंदाजांची आतिषबाजी! 'स्नेहल'चे दुसरे द्विशतक; मिझोराम संकटात

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

SCROLL FOR NEXT