UP Crime Dainik Gomantak
देश

UP Groom Arrested: मेहंदी लावलेला हातात पडल्या बेड्या, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची तुरूंगात रवानगी

प्रशांत गुप्ताविरुद्ध अनेक मुलींशी लग्न करण्याच्या नावाखाली शोषण आणि अमली पदार्थांची तस्करी यासह 12 गुन्हे दाखल आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

UP Groom Arrested: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. शहरातील रसूलपूर परिसरात राहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी लग्नापूर्वीच तुरूंगात पाठवले आहे.

आरोपीला पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर त्याच्या मेंदीने माखलेल्या हातांना हातकड्या लावून तुरुंगात नेण्यात आले.

गुरुदेव नगरमध्ये राहणाऱ्या प्रशांत गुप्ता उर्फ ​​जॅकी या तरुणाचे 21 एप्रिल (शुक्रवार) रोजी लग्न होणार होते. घरी सर्व तयारी पूर्ण झाली. मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू होती दरम्यान, अचानक पोलीस येतात आणि प्रशांत गुप्ता उर्फ ​​जॅकीला अटक करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत गुप्ता उर्फ ​​जॅकी याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. आरोपी तरुण हा रसूलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिस्ट्री शीटर आहे. आपला गुन्हेगारी इतिहास मुलींपासून लपवून तो लग्न करणार होता.

प्रशांतच्या हाताला मेहंदी लावलेली असताना पोलिसांनी त्याला अटक केली. लग्नापूर्वीच पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले व तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

प्रशांत गुप्ताविरुद्ध अनेक मुलींशी लग्न करण्याच्या नावाखाली शोषण आणि अमली पदार्थांची तस्करी यासह 12 गुन्हे दाखल आहेत.

प्रशांत उर्फ ​​जॅकीविरुद्ध रसूलपूर पोलिस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका एफआयआरमध्ये महिलेने आरोपींवर शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणांमध्ये आरोपींचा जोरदार शोध सुरू होता.

आता आरोपी लग्न करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यापूर्वीच त्याला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT