Corona Vaccine Dainik Gomantak
देश

18 वर्षावरील व्यक्तींना मिळणार कोरोना लसीचा तिसरा डोस

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरण मोहीम सातत्याने राबवत आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरण मोहीम सातत्याने राबवत आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आता रविवार म्हणजेच 10 एप्रिल 2022 पासून खाजगी लसीकरण केंद्रांवर तिसरा डोस देण्यात येणार आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले सर्व लोक बूस्टर डोससाठी पात्र असतील. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण (Vaccination) केंद्रात उपलब्ध असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम तसेच सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाईन्स वर्कर आणि 60+ वर्ष वयोगटातील नागरिकांना तिसरा डोस देण्याचा कार्यक्रम सुरुच राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अधिक गती दिली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. (People over the age of 18 will be given a third dose of the corona vaccine)

सध्या, देशातील 15+ वयोगटातील सुमारे 96% लोकसंख्येला COVID-19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर 15+ लोकसंख्येपैकी सुमारे 83% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, 24 दशलक्षाहून अधिक प्रतिबंधात्मक डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येला देण्यात आले आहेत. 12 ते 14 वर्षे वयोगटातील 45% लोकांना देखील पहिला डोस मिळाला आहे.

शिवाय, कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने म्हटले आहे की, आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे वयोगटापुढील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. मोफत लसीकरण कार्यक्रमासोबत पात्र नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

SCROLL FOR NEXT