योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेशात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले त्यापैकी बहुतांश प्रकल्प माझ्या सत्तेच्या काळात सुरू करण्यात आले होते, असे विधान समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शनिवारी केले.
ते पुढे म्हणाले, "समाजवादी पक्षाच्या सरकारने जमीन दिली नसती तर गोरखपूर एम्स कधीच बांधता आले नसते. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लोकांना आता 'योगी' सरकार (Yogi Government) नको आहे, त्यांना 'योग्य' सरकार हवे आहे."
पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सरयू नाहर कॅनल प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर अखिलेश यादव यांनी ट्वीट करून मोदींना टोला लगावला. मोदींच्या 'साफ दिखता है' टिप्पणीचा स्पष्ट संदर्भ देत यादव यांनी ट्विटरवर लिहिले, जगात मुळात दोन प्रकारचे लोक आहेत - काही खरोखर काम करणारे आणि काही इतरांचे श्रेय घेणारे. (मागील) सपाचे कार्यरत सरकार आणि सध्याचे रिबन कापणारे सरकार यामध्ये स्पष्ट फरक आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत भाजपचा पूर्णपणे सफाया होणार आहे.
यादव म्हणाले की, "समाजवादी पक्षाने तरुणांना लॅपटॉप दिले असताना भाजपने त्यांच्यावर लाठीचार्ज केला. भाजप प्रकल्पांपेक्षा जाहिरातींवर जास्त खर्च करते. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी स्वप्ने भाजपने दाखवली, उत्पन्न वाढलेले शेतकरी कुठे आहेत? तरुणांना नोकऱ्या मिळत आहेत, असे मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत, त्यांना यूपीमध्ये कुठे नोकऱ्या दिल्या आहेत?"
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.