कोची : केरळ विधानसभा निवडणूकांना काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी केरळमधील भाजपा, कॉंग्रेस आणि इतर स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी जिवाजी बाजी लावल्याचे दिसत आहे. मात्र यात ते कितपत यशस्वी होतात हे 2 मे रोजी म्हणजेच निकालाच्या दिवशीच कळणार आहे. दरम्यान, केरळमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजपानेही प्रचारसभांचा नुसता धडका लावला आहे. अशातच पुन्हा एकदा भाजपा नेत्याच्या व्यक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. केरळमध्ये 90 टक्के साक्षरता आहे. म्हणूनच येथे भाजपाला प्रगती करता येत नाही. असे भाजपा नेते आमदार ओ राजगोपाल यांनी म्हंटले आहे. दोन दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ओ राजगोपाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आमदार ओ राजगोपाल हे केरळमधील भाजपाचे एकमेव नेते आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केरळमध्ये भाजप पक्षाची वाढ का होत नाही, यावर एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ''केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मतदान करत नाहीत, केरळ हे राज्य इतर राज्यांहून वेगळं आहे. या राज्यात भाजपची वाढ होत नाही त्यामागे दोन-तीन गोष्टी आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या राज्यातील साक्षरता दर हा 90 टक्के इतका आहे. लोक उच्चशिक्षित असल्याने ते कोणत्याही प्रश्नावर वाद-विवाद करू शकतात त्यांना वाटतं,'' असं ओ राजगोपाल यांनी म्हटल आहे.
तर दूसरा मुद्दा म्हणजे, केरळची जनता कोणत्याही गोष्टीचा पूर्णपणे आणि तर्कशुद्ध विचार करूनच निर्णय घेते. इथल्या सुशिक्षित लोकांची ही सवयच आहे. त्याचबरोबर केरळमध्ये हिंदूंचे प्रमाण हे 55 टक्के आहे तर अल्पसंख्यांकांचे प्रमाण हे 45 टक्के आहे. त्यामुळे भाजपची राजकीय गणिते जुळत नाहीत. याच कारणामुळे केरळची तुलना इतर राज्यांशी करता येत नाही. म्हणून आम्ही हळूहळू का असेना पण सातत्याने प्रयत्न करत आहोत." असंही ओ राजगोपाल यांनी यावेळी नमूद केलं.
तसेच, ''यंदाच्या निवडणुकीत डाव्या पक्षांना काही प्रमाणात यश मिळेल.असंही त्यांनी म्हटल. पण अलीकडच्या काळात कॉंग्रेस पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कॉंग्रेसची स्थिती एका बुडणाऱ्या जहाजासारखी झाली आहे. त्यामुळे कोणीही कॉंग्रेस पक्षात सामील होण्यासाठी तयार होत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन होणार नाही,'' अशी टीकाही ओ राजगोपाल यांनी केली. त्याचबरोबर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा दुहेरी आकड्यांपर्यंत विजय मिळवेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच, प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की, मांजेश्वरमध्ये शेवटच्या वेळी त्यांचा 89 मतांनी पराभव झाला होता. साहजिकच, त्यांना या वेळी जिंकण्याची चांगली संधी आहे. सबरीमाला विरोधामुळे त्यांचे कोचीशी भावनिक नाते जोडले गेले आहे.
दरम्यान, ओ राजगोपाल यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आपलं ओ राजगोपाल यांना खोचक टोला लगावला आहे. ट्विट करत शशी थरूर म्हणाले की, "माझ्या मित्राने एका मुलाखतीत हा महत्वपूर्ण खुलासा केलाय की केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने पूर्णपणे विचार करूनच मते देतात,'' असं शशी थरूर यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.