Fastag Dainik Gomantak
देश

Paytm Fastag: पे-टीएम फास्टॅग यूजर्ससाठी महत्वाची बातमी; दोन दिवसात घ्यावा लागणार नवा टॅग, अन्यथा...

Paytm Fastag Alert: आरबीआयने दिलेली मुदत दोन दिवसांनी संपणार आहे. 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएम फास्टॅगच्या सेवा बंद होतील.

Manish Jadhav

Paytm Fastag Alert: आरबीआयने दिलेली मुदत दोन दिवसांनी संपणार आहे. 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएम फास्टॅगच्या सेवा बंद होतील. NHAI ने पेटीएम फास्टॅग संदर्भात ॲडवायजरी जारी केली आहे. NHAI ने लोकांना पेटीएम फास्टॅग बदलण्यास सांगितले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्चपर्यंत फास्टॅग बदलण्यास सांगितले आहे. NHIA ने म्हटले आहे की, टोल प्लाझावर होणारी गैरसोय टाळण्यासाठी, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्च 2024 पूर्वी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेला फास्टॅग घ्यावा लागेल.

दरम्यान, तुम्ही पेटीएम फास्टॅग सुरु ठेवल्यास दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर, पेटीएम फास्टॅग वापरकर्ते 15 मार्च 2024 नंतर बॅलन्स रक्कम रिचार्ज किंवा टॉप-अप करु शकणार नाहीत. तथापि, जोपर्यंत त्यांच्याकडे फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे तोपर्यंत ते वापरु शकतात.

NHAI ने ॲडवायजरी जारी केली

दुसरीकडे, NHAI ने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्चपर्यंत दुसऱ्या बँकेकडून नवीन फास्टॅग घेण्यास सांगितले आहे. NHAI ने टोल प्लाझावरील गैरसोय टाळण्यासाठी 15 मार्चपूर्वी इतर कोणत्याही बँकेकडून (Bank) नवीन फास्टॅग घेण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, यामुळे प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना दंड किंवा दुप्पट टोल टॅक्स (Tax) टाळता येणार आहे.

अन्यथा दुप्पट टोल कर आकारला जाईल

तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की पेटीएम पेमेंट्स बँकेशी संबंधित निर्बंधांवरील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांचे पालन करुन, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्च 2024 नंतर रिचार्ज किंवा त्यांचा शिल्लक बॅलन्स टॉप-अप करण्याचा पर्याय नसेल. तथापि, ते देय तारखेनंतरही टोल भरण्यासाठी बॅलन्स वापरणे सुरु ठेवू शकतात, असे त्यात म्हटले आहे. NHAI ने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना त्यांच्या संबंधित बँकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे किंवा IHMCL (इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) च्या वेबसाइटवर दिलेले FAQ पाहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT