Patna High Court
Patna High Court Dainik Gomantak
देश

Patna High Court: "तुम्ही सिनेमागृहात आहात का?" 'ड्रेस कोड'वरून न्यायाधीशांनी IAS ला फटकारले

दैनिक गोमन्तक

पाटणा उच्च न्यायालयाच्या (Patna High Court) न्यायाधीशांनी शुक्रवारी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला त्याच्या 'अनुचित' ड्रेसिंग कोडबद्दल फटकारले आहे. न्यायाधीशांनी आयएएस अधिकाऱ्याला फटकारले आणि त्यांना विचारले की आपण चित्रपटगृहात आल्या सारखे वाटते का? त्याच वेळी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या फटकारण्यावर, आयएएस अधिकारी आनंद किशोर म्हणाले की त्यांना कोर्टात घातल्या जाणार्‍या कोणत्याही ड्रेस कोडबद्दल माहिती नाहीये. (Patna High Court judge reprimands IAS officer over dress code)

हे प्रकरण न्यायाधीश पीबी बजंथरी यांच्या कोर्टाशी संबंधित आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. वरिष्ठ IAS अधिकारी आनंद किशोर हे बिहार सरकारच्या गृहनिर्माण तसेच शहरी विकास विभागाचे प्रधान सचिव आहेत. आनंद किशोर हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जवळचे मानले जातात.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला फटकारताना दिसून येत आहेत. पांढऱ्या शर्टमध्ये कॉलरची बटणे उघडलेले आणि ब्लेझरशिवाय आयएएस अधिकारी सुनावणीला आले होते. अयोग्य ड्रेसकोड पाहून न्यायाधीशांनी आनंद किशोर यांना विचारले की, मसुरी येथील सिव्हील सेवा प्रशिक्षण संस्थेत गेला नव्हता का?

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या प्रश्नांना अधिकारी उत्तरे देऊ शकले नाहीत आणि त्यांचे म्हणणे ऐकत उभे राहिले होते. IAS अधिकाऱ्याच्या अयोग्य ड्रेसकोडमुळे हताश होऊन न्यायाधीश बजंथरी यांनी विचारले की, "तुम्हाला हा सिनेमा हॉल आहे असे वाटते का? कोर्टात कोणत्या ड्रेस कोडमध्ये हजर राहायचे हे तुम्हाला माहीत नाही का? निदान कोट, आणि कॉलर तरी उघडी नसावी."

यादरम्यान अधिकारी त्यांच्या आजूबाजूला वकिलाकडे बघताना दिसून आले. न्यायमूर्तींच्या या फटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून लोक तो व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये न्यायाधीशांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ फटकारले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अयोग्य ड्रेस कोडवर न्यायमूर्ती नाराज झाले आणि त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT