SpiceJet plane
SpiceJet plane ANI
देश

स्पाईसजेट विमानाची पाटणामध्ये इमर्जन्सी लँडिंग; 192 जण थोडक्यात बचावले

दैनिक गोमन्तक

पाटणा : पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या ‘एसजी-725’ या विमानाच्या इंजिनने रविवारी अचानक पेट घेतला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत आग लागल्यानंतर विमान सुरक्षितपणे पाटणा विमानतळावर उतरविले. त्यामुळे जवळपास 192 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. (Delhi-bound SpiceJet plane)

आज रविवारी दुपारी विमानाने पाटणा विमानतळावरुन उड्डाण केले. मात्र काही वेळातच विमानाच्या इंजिनात स्फोट होऊन आग लागली. सुमारे दहा मिनिटांनंतर वैमानिकाने विमान काळजीपूर्वक विमानतळावर उतरवले. नागरी हवाई वाहतूक महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षी धडकल्यामुळे इंजिनला आग लागली. विमानात 185 प्रवासी आणि 6 केबिन क्रु होते. हे सर्वजण सुरक्षित आहेत.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणानंतर त्याच्या पहिल्या इंजिनाला पक्ष्याची धडक बसली. खबरदारी म्हणून, कॅप्टनने इंजिन बंद केले आणि विमान पुन्हा पाटणा विमानतळावर उतरविले. पक्षाच्या धडकेमुळे तीन पंख्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे उड्डाण होताच मोठा आवाज झाला. त्यानंतर इंजिनातून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. विमानातील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजानंतर इंजिनातून ठिणग्या पडताना खिडकीतून दिसत होते. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT