Iltija Mufti  Dainik Gomantak
देश

PDP सुप्रीमो मेहबूबा मुफ्ती यांची लेक भडकली, 'पासपोर्ट जारी करुन माझ्यावर...'

PDP Supremo Mehbooba Mufti: पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या सुप्रीमो मेहबूबा मुफ्ती यांची लेक इल्तिजा मुफ्ती यांना पासपोर्ट जारी करण्यात आला आहे.

Manish Jadhav

PDP Supremo Mehbooba Mufti: पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या सुप्रीमो मेहबूबा मुफ्ती यांची लेक इल्तिजा मुफ्ती यांना पासपोर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, इल्तिजा यांच्या पासपोर्टची वैधता 2 वर्षांसाठी आहे.

पासपोर्ट कार्यालयाने पोलिसांच्या (Police) गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) मंजुरी न मिळाल्याने पासपोर्ट देण्यास नकार दिल्यानंतर इल्तिजा यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

35 वर्षीय इल्तिजा यांनी सांगितले होते की, मला परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तातडीने पासपोर्टची आवश्यकता आहे.

'पासपोर्ट देऊन उपकार केला नाही'

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना लिहिलेल्या पत्रानुसार, उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या इल्तिजा यांना पासपोर्ट जारी करण्यात आला आहे.

या पत्रानुसार, इल्तिजा यांचा पासपोर्ट 5 एप्रिल 2023 ते 4 एप्रिल 2025 पर्यंत वैध आहे. पासपोर्ट जारी झाल्यानंतर इल्तिजा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

इल्तिजा यांनी पासपोर्ट (Passport) जारी करुन कोणतेही उपकार केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांच्या पासपोर्टची वैधता केवळ 2 वर्षांसाठी आहे.

मेहबुबा यांना अद्याप नवीन पासपोर्ट मिळालेला नाही

याआधी, मार्च 2021 मध्ये मेहबुबा आणि त्यांची 80 वर्षीय आई गुलशन नजीर यांनाही पासपोर्ट नाकारण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दिलेल्या उलटसुलट अहवालांमुळे हे केले गेले होते.

मेहबूबा यांचा पासपोर्ट अद्याप जारी झालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात पासपोर्ट प्राधिकरणाला मेहबुबा मुफ्ती यांना नवीन पासपोर्ट जारी करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT