Paragliding Tips Dainik Gomantak
देश

Paragliding Tips: पॅराग्लायडिंग करताना गोव्यात दोघांचा मृत्यू; अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? 5 महत्वाच्या टिप्स

Safety Tips for Paragliding: पॅराग्लायडिंग रोमांचक आणि साहसी खेळांपैकी एक आहे, पण योग्य काळजी न घेतल्यास हा खेळ धोकादायक ठरू शकतो.

Sameer Amunekar

पणजी: गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्ये पॅराग्लायडिंग अपघातात पर्यटकांचा मृत्यू झाला. गोव्यातील अपघातात पर्यटक महिलेसह तिच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यातील अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. या दोन अपघातामुळे पॅराग्लायडिंग करताना सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला.

गेल्या काही दिवसांत भारतात पॅराग्लायडिंग अपघातांमुळं अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे. पॅराग्लायडिंग दरम्यान होणाऱ्या बऱ्याच अपघातांकडे लक्ष वेधून झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी तरुणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

अनेक अपघात होऊनही, लोक हा साहसी खेळ खेळण्यास प्राधान्य देतात. पॅराग्लायडिंग प्रदान करणाऱ्या कंपनीचं कमी संशोधन, टेकऑफ आणि लँडिंगबाबात समज नसणं आणि हवामान परिस्थिती यामुळं पॅराग्लायडिंग अपघातांचा धोका वाढू शकतो, असं श्रीधर वेम्बू मिंट या ऑनलाईन माध्यमाशी बोलताना म्हणालेत.

पॅराग्लायडिंग रोमांचक आणि साहसी खेळांपैकी एक आहे, पण योग्य काळजी न घेतल्यास ते धोकादायक ठरू शकते. खालील सुरक्षा टिप्स आणि काळजीच्या गोष्टी पाळून तुम्ही तुमचा अनुभव सुरक्षित आणि आनंददायक बनवू शकता.

१) हवामानाची स्थिती

पॅराग्लायडिंग करताना त्या ठिकाणाच्या हवामान अंदाजांबद्दल माहिती असणं महत्वाचं आहे. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांचा आनंद घेण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज तपासावं. प्रचंड वारा, पाऊस असल्यास पॅराग्लायडिंग करू नका. शांत हवामानातच उड्डाण करणे सुरक्षित असते.

२)अनुभवी प्रशिक्षक

नेहमी अनुभवी प्रशिक्षक किंवा संस्थेकडूनच पॅराग्लायडिंग करा. तुमच्या प्रशिक्षकाकडे योग्य परवाने आणि अनुभव आहे का, याची खात्री करा. सरकार किंवा पर्यटन विभाग मान्यता दिलेल्या पॅराग्लायडिंग साइट निवडा. योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उड्डाण करा.

३) उड्डाणानंतर किमान ३०-४५ मिनिटं विश्रांती

पॅराग्लायडिंग असोसिएशन ऑफ इंडिया (Paragliding Association of India - PAI) च्या सुरक्षा नियमांनुसार, पायलटने दिवसाला जास्तीत जास्त ४ उड्डाणे करावीत. प्रत्येक उड्डाणानंतर किमान ३०-४५ मिनिटे विश्रांती घ्यावी. अतिशय थकवा जाणवत असल्यास त्या दिवशी अधिक उड्डाणे करू नयेत. सतत उड्डाणांमुळे शरीरावर ताण येतो.

४) योग्य सुरक्षा उपकरणं

डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट अनिवार्य आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी . रेझर्व्ह पॅराशूट असणं आवश्यक आहे. तसंच हात आणि पायांचं संरक्षण करण्यासाठी ग्लोव्ह्ज आणि बूट्स आवश्यक आहे. पॅराग्लायडिंगसाठी आरामदायक हार्नेसही वापरणे आवश्यक आहे.

५) टेकऑफ आणि लँडिंगच्या सूचना पाळा

टेकऑफ करताना घाईगडबड करू नका. लँडिंगच्या वेळी पाय योग्य स्थितीत ठेवा आणि धक्का बसू नये, याची काळजी घ्या. उड्डाणादरम्यान पायलटच्या किंवा प्रशिक्षकाच्या सूचनांचं काटेकोर पालन करा. या साहसी खेळासाठी तुम्ही ज्या कंपनीची निवड करत आहात त्या कंपनीची आधी पार्श्वभूमी तपासा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT