IndiGo flight takes off within seconds of landing Dainik Gomantak
देश

Panic On IndiGo Flight: ...आणि विमान पुन्हा झेपावले; प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी घटना

IndiGo Crisis: या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला तर कही प्रवाशी घाबरून गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

Chandigarh to Ahmedabad Flight 

सोमवारी रात्री इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने चंदीगडहून अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

 6E 6056 क्रमांकाचे हे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाच्या धावपट्टीला स्पर्श करून अचानक पुन्हा आकाशात झेपावले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला तर कही प्रवाशी घाबरून गेले.

“विमानाने लँडिंग करण्यापूर्वी 20 मिनिटे हवेत चक्कर मारली. विमान रात्री 8.45 च्या सुमारास धावपट्टीवर उतरण्यास सुरुवात झाली, परंतु तिची चाके जमिनीला स्पर्श करताच पायलटने अचानक वर खेचली आणि विमान पुन्हा एकदा हवेत उडाले. काय झाले ते कोणालाच समजले नाही म्हणून आम्ही घाबरलो, या अनेपेक्षित घटनेमुळे शंभरहून अधिक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता,"  असे एका प्रवाशाने सांगितले.  

सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, धावपट्टीवर काहीततरी अज्ञात वस्तू दिसल्याने हवाई वाहतूक नियंत्रकाने ताबडतोब पायलटला गो-अराउंड, म्हणजेच टेक ऑफ करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लॅंडींग होणाऱ्या विमानाने पुन्हा टेक ऑफ केले. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत नाही.

"जर प्रशासनाने धावपट्टी केली नाही, तर विमान प्रथम कसे उतरले? मी इंडिगो एअरलाइन्सच्या ड्युटी मॅनेजरशीही संपर्क साधला, त्यांनी मला सांगितले की मी संबंधित अधिकाऱ्यांना ईमेल पाठवल्यास चौकशी केली जाऊ शकते. मला आशा आहे की ते सविस्तर चौकशी करतील," असे एका प्रवाशाने सांगितले.

त्याच फ्लाइटमधील आणखी एक प्रवाशी, तेजस जोशी यांनी ट्विट केले: "आज विमान क्र. 6E 6056 चंदिगड ते अहमदाबाद, अहमदाबाद विमानतळावर उतरू शकले नाही. फ्लाइट नुकतेच धावपट्टीवर पोहोचले आणि पुन्हा एकदा उड्डाण केले. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण." त्याने आपल्या ट्विटमध्ये इंडिगो आणि एएआयला टॅग केले आहे.

प्रवाशाचा ज्योतिरादित्य सिंधिया यांना मेल  

अहमदाबादचे प्रवासी डॉ. नील ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे 100 हून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात आला. त्यांनी  नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना ईमेल पाठवून आपली चिंता व्यक्त केली. त्यांच्या ईमेलमध्ये ठक्कर यांनी नमूद केले की, लँडिंगनंतर त्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी पायलटशी संपर्क साधला. मात्र, वैमानिकाकडून समाधानकार उत्तर मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

SCROLL FOR NEXT