Rahat Fateh Ali Khan Dainik Gomantak
देश

Rahat Fateh Ali Khan Arrested: प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक, कारण आलं समोर?

Rahat Fateh Ali Khan Arrested At Dubai Airport: पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना सोमवारी (22 जुलै) दुबई विमानतळावर अटक करण्यात आली.

Manish Jadhav

Rahat Fateh Ali Khan Arrested At Dubai Airport: पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना सोमवारी (22 जुलै) दुबई विमानतळावर अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खान यांना त्यांच्या पूर्व मॅनेजरच्या तक्रारीनंतर दुबईत अटक करण्यात आली आहे. खान यांच्या पूर्व मॅनेजरचे नाव सलमान अहमद आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. खान यांनी सलमानला नोकरीवरुन काढूनही टाकले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर सलमानने दुबईत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राहत फतेह अली खान एका म्यूझिकल शोसाठी दुबईत असताना बुर्ज दुबई पोलिसांनी त्यांना अटक केली.

दरम्यान, राहत यांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते आपल्या नोकराला मारहाण करताना दिसत होते. मात्र, नंतर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली होती. राहत फतेह अली खान हे पाकिस्तानातील मोठे नाव आहे. त्यांनी पाकिस्तानी तसेच बॉलिवूड चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहेत. 'जरुरी था', 'तू इतनी खूबसूरत है', 'मैं जहाँ रहूं', 'तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी' ही त्यांची काही लोकप्रिय गाणी आहेत.

मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीचा आरोप

यावर्षाच्या सुरुवातीला फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) राहत फतेह अली खान यांच्यावर कारवाई केली होती. राहत यांच्यावर 12 वर्षांत लोकल आणि इंटरनॅशनल म्यूझिक कॉन्सर्टमधून अंदाजे 8 अब्ज रुपये कमावल्याचा आरोप करण्यात आला होता. अशा परिस्थितीत एजन्सीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT