Cricketer House Attack Dainik Gomantak
देश

Cricketer House Attack: क्रिकेट जगतात खळबळ! 'या' स्टार क्रिकेटपटूच्या घरावर गोळीबार; कुटुंबातील सदस्य सुरक्षित, 5 जण अटकेत VIDEO

Naseem Shah House Attack: गोळीबारात घराची खिडकी, पार्किंग एरिया आणि मुख्य प्रवेशद्वार यांचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यात कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही.

Manish Jadhav

Naseem Shah House Attack: श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्याच्या अगदी तोंडावर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह याच्या खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) येथील 'हुज्र' नावाच्या घरावर मोठा हल्ला झाला. काही अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात नसीम शाहच्या घराचे मोठे नुकसान झाले. गोळीबाराच्या वेळी नसीम शाहचे कुटुंबीय घरात उपस्थित असूनही त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 संशयितांना अटक केली.

गोळीबारात घराचे नुकसान

दरम्यान, हा हल्ला खैबर पख्तूनख्वा येथे नसीम शाहच्या घरावर झाला. हल्ल्याच्या वेळी नसीमचे कुटुंबीय घरातच सुरक्षित होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात घराची खिडकी, पार्किंग एरिया आणि मुख्य प्रवेशद्वार यांचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यात कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व सदस्य सुखरुप आहेत. नसीमचे छोटे भाऊ, हुनेन शाह आणि उबैद शाह, त्यावेळी घरी होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास

या घटनेनंतर पोलिसांनी (Police) तात्काळ तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी 5 संशयित लोकांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरु आहे. गोळीबार करण्यामागे वैयक्तिक वाद आहे की, अन्य कोणते कारण, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आता नसीम शाहच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली आहे.

नसीम शाह श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत व्यस्त

ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा नसीम शाह रावळपिंडी येथे पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघातर्फे श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपस्थित होता. श्रीलंकाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आज, 11 नोव्हेंबरपासून रावलपिंडी येथे सुरुवात होत आहे. नसीम शाह या मालिकेचा भाग आहे. या वनडे मालिकेनंतर तो पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिरंगी टी-20 मालिकेतही खेळताना दिसणार आहे.

आज 11 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील पहिला वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर 13 नोव्हेंबरला दुसरा आणि 15 नोव्हेंबरला तिसरा वनडे सामना याच मैदानावर होणार आहे. क्रिकेट मालिकेपूर्वी स्टार खेळाडूच्या घरावर झालेल्या या हल्ल्यामुळे नसीम शाह आणि त्याचे कुटुंबीय तणावात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'रील'साठी पठ्ठ्यानं धावत्या ट्रेनमध्ये घातला आंघोळीचा घाट, प्रवासीही हैराण, अखेर पोलिसांनी पकडले; व्हिडिओ तूफान व्हायरल

Pooja Naik : "पोलिसांना थोडा वेळ द्या", CM सावंतांकडून 'नवीन FIR'चे आदेश; नोकरी घोटाळा प्रकरणी तपासाची दिशा बदलणार?

Ranji Trophy 2025: दिल्लीला नमवून जम्मू-काश्मीरने रचला इतिहास! ऐतिहासिक विजयाचा 'रन चेस' ठरला खास, 96 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Rohit Sharma Dance Video: 'मेरे यार की शादी है' गाण्यावर रोहित शर्माचा डान्स, वेडिंग फोटोशूटदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Goa Governance: 'गोमंतकीयांच्या समस्या आता AI सोडवणार'! मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; 90% तक्रारींचा 2 दिवसांत निवारणाचा दावा

SCROLL FOR NEXT