Jammu kashmir Dainik Gomantak
देश

Pakistan: पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

Jammu Kashmir Ceasefire Violation: जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (एलओसी) बुधवारी (12 फेब्रुवारी) पाकिस्तानी सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

Manish Jadhav

Jammu Kashmir Ceasefire Violation: पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याचं नाव घेत नाहीये. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (एलओसी) बुधवारी (12 फेब्रुवारी) पाकिस्तानी सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने सुमारे 15 राउंड गोळीबार केला. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार थांबला. त्याचवेळी, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोणताही सैनिक ठार किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

शस्त्रसंधींचे उल्लंघन

दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला होता, परंतु पाकिस्तान त्याचे सतत उल्लंघन करत आहे. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा गोळीबार केला आहे.

11 सप्टेंबर 2024 - कानाचक सेक्टर, जम्मू

14 फेब्रुवारी 2024 - आरएस पुरा सेक्टर, जम्मू

09 नोव्हेंबर 2023- रामगड सेक्टर, सांबा

27 ऑक्टोबर 2023- अर्निया सेक्टर, जम्मू

आता पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने पूंछ नियंत्रण रेषेवर गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क असून कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी सज्ज आहे.

भारतीय लष्कर हाय अलर्टवर

शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यासोबतच पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. 11 फेब्रुवारी रोजी जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला, ज्यामध्ये एका कॅप्टनसह दोन सैनिक शहीद झाले होते. या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) हाय अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संस्थांनुसार, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हमास सारख्या दहशतवादी संघटनांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये बैठक घेतली, त्यानंतर भारतात दहशतवादी हल्ल्यांचे कट रचण्याचे प्रकार तीव्र झाले. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

राजौरी-पूंछमध्ये हालचाली वाढल्या

घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारतीय लष्कराला आणखी एक यश मिळाले आहे. 9 फेब्रुवारी रोजी जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये रहमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संशयित घुसखोराला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील कोटली भागातील रहिवासी असल्याचे उघड झाले. यापूर्वी, 30 आणि 31 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी पूंछ नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला होता. या सततच्या घटनांवरुन हे स्पष्ट होते की, पाकिस्तान आपली दहशतवादी कारस्थाने थांबवायचं नाव नाहीये.

भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज

पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या या नापाक कारवाया लक्षात घेता, भारतीय लष्कराने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांमध्येही दक्षता वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानचा कोणताही कट तात्काळ उधळून लावता यावा यासाठी लष्कर आणि बीएसएफच्या जवानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ते सर्व परिस्थितीत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असून कोणत्याही घुसखोरीला किंवा शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT