Danish Kaneria Viral Post Dainik Gomantak
देश

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Danish Kaneria Viral Post: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरिया याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, ती सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

Sameer Amunekar

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरिया याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, ती सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. कानेरियाच्या या पोस्टमध्ये त्याने स्वतःवर होत असलेल्या टीकेवर थेट उत्तर दिले आहे. अनेकांनी त्याला ट्रोल करत विचारले होतं की, तो पाकिस्तानबाबत का बोलत नाही आणि भारताच्या अंतर्गत बाबींवर का आपली मते मांडतो. यावर कानेरियाने सोशल मिडियावर पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे.

कानेरियाने म्हटले की, “अलिकडच्या काळात मी अनेक लोकांना पाहिले आहे, जे मला विचारतात की मी पाकिस्तानबद्दल का बोलत नाही, मी भारताच्या अंतर्गत बाबींवर का भाष्य करतो, आणि काही लोक असा आरोपही करतात की मी हे सर्व भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी करतो. परंतु हे सर्व खरे नाही.”

त्याने पुढे स्पष्ट केले की, पाकिस्तान आणि त्याच्या लोकांकडून त्याला अवामकडून प्रेम मिळाले आहे, परंतु त्याचबरोबर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कडून भेदभावाचा सामना करावा लागला. कानेरियाने असेही सांगितले की, आपल्यावर धर्मांतरासाठी दबाव देखील टाकण्यात आला.

कानेरियाने भारत आणि त्याच्या नागरिकत्वाबद्दल स्पष्टतेने सांगितले की, “पाकिस्तान माझी जन्मभूमी असू शकते, परंतु माझ्या पूर्वजांची भूमी भारत ही माझी मातृभूमी आहे. माझ्यासाठी भारत म्हणजे एका मंदिरासारखे पवित्र स्थान आहे. सध्या माझ्या मनात भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा कोणताही विचार नाही.”

त्याने पुढे म्हटले की, “जर भविष्यात अशा निर्णयाची आवश्यकता भासली, तर आमच्यासारख्या लोकांसाठी सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आधीच अस्तित्वात आहे. त्यामुळे जे लोक असा दावा करतात की माझी कृती किंवा शब्द नागरिकत्वासाठी प्रेरित आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहे.”

दानिश कानेरियाने आपल्या पोस्टमध्ये धर्म आणि नीतिमत्तेचे समर्थन करत राहण्याचेही जाहीर केले आणि म्हटले की, “मी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रद्रोही आणि बनावट धर्मनिरपेक्षतेचा पर्दाफाश करत राहीन.”

त्याने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबतही दिलासा दिला आणि म्हटले की, प्रभु श्रीरामांच्या आशीर्वादाने तो आणि त्याचे कुटुंब सुरक्षित आणि आनंदी आहेत. दानिश कानेरियाचा हा खुलासा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, अनेक चाहत्यांकडून समर्थन आणि प्रशंसा मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT