Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa Vegetable Rates: राज्यात अजूनही नारळाचे दर आवाक्यात आलेले नाहीत. बाजारात मध्यम आकाराचा नारळ हा ३० ते ३५ रुपयांना विकला जात आहे. मोठ्या आकाराचा नारळ ५० ते ६० रुपयांना विकला जात आहे.
Goa Coconut  Price
Goa Coconut Price Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात अजूनही नारळाचे दर आवाक्यात आलेले नाहीत. बाजारात मध्यम आकाराचा नारळ हा ३० ते ३५ रुपयांना विकला जात आहे. तर मोठ्या आकाराचा नारळ ५० ते ६० रुपयांना विकला जात आहे.

स्थानिक भाज्यांना पणजी बाजारात चांगली मागणी आहे. सध्या चिबूड, काकडी आदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत असून अनेक ग्राहक ते आवर्जून खरेदी करत आहेत. राज्यात गेल्या आठवड्यापासून भाज्यांचे दर स्थिर आहेत;

Goa Coconut  Price
Goa Vegetable Rates: दसऱ्यानंतर भाज्यांच्या किंमतीत बदल! रताळी, भुईमुगाच्या शेंगा बाजारात दाखल; जाणून घ्या ताजे दर..

परंतु आठवड्याभरापूर्वी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. इतर भाज्याही जसे कांदा, बटाटा प्रतिकिलो ४० रुपयांनी विकले जात आहेत.

Goa Coconut  Price
Goa Vegetable Price: चतुर्थीत दर भडकले! बाजारात भाज्यांना वाढती मागणी; नारळसुद्धा परवडेना

चतुर्थी, दसरा उत्सवादरम्यान भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. परंतु येत्या काळात भाज्यांचे दर स्थिरावतील, असे पणजीतील विक्रेत्यांना सांगितले. पणजी बाजारात गाजर ६० रुपये, काकडी ५० रुपये, भेंडी ७०, कारली ८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com