PM Modi | Austrian military historian Tom Cooper Dainik Gomantak
देश

हो आम्ही हरलो! पाकिस्तानने पराभव मान्य करत शस्त्रसंधीसाठी भारताला केली विनंती; ऑस्ट्रियन हवाई युद्ध विश्लेषक टॉम कूपर

India Pakistan War: भारताने आण्विक शस्त्रसाठ्या असलेल्या ठिकाणांवर देखील हल्ला केला. भारताच्या या हल्ल्याला पाकिस्तानला हवा तसा प्रतिकार करता आला नाही

Pramod Yadav

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलिकडेच झालेल्या चकमकीत पाकिस्तानने विजयी झाल्याचा आव आणत दिखावा करण्यास सुरुवात केली आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील हवाई आणि लष्करी तळ उद्धवस्त केल्याचा पुरावा दिला, तरीही पाकिस्तान विजयाचा खोटा दिखावा करतच आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा हा दिखावा आता हवाई युद्धाचे ऑस्ट्रियन विश्लेषक आणि अभ्यासक टॉम कूपर यांनी उघडा पाडला आहे. पाकिस्तानने पराभव मान्य करत भारताकडे शस्त्रसंधी करण्याची मागणी केली असे कूपर यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रियन लष्करी अभ्यासक आणि इतिहासकार टॉम कूपर यांनी अलिकडेच काही वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याचे स्पष्ट केले.

"भारताने पाकिस्तानच्या हवाई आणि लष्करी तळांना लक्ष्य केले, यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने आण्विक शस्त्रसाठ्या असलेल्या ठिकाणांवर देखील हल्ला केला. भारताच्या या हल्ल्याला पाकिस्तानला हवा तसा प्रतिकार करता आला नाही", असे कूपर यांनी म्हटले आहे.

कूपर यांनी याबाबत एक सविस्तर ब्लॉग देखील लिहला असून, भारत हल्ला करत असतान दुसऱ्या बाजुला हल्ला करण्याची सक्षमता नसणे या माझ्या नजरेत भारताचा स्पष्ट विजय आहे, असे कूपर यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

"भारताचा प्रतिकार करावा असे मिसाईल पाकिस्तानकडे नाहीत. भारताकडे हल्ला करण्यासाठी ब्राम्होस आहे तर हल्ला रोखण्यासाठी स्काल्प सारखी सुरक्षा यंत्रणा आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या नूर खान आणि सरगोधा हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओ यांनी संपर्क साधून शस्त्रसंधी करण्याची विनंती केली", असे कूपर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

टॉम कूपर हवाई युद्धाचे प्रसिद्ध विश्लेषक आहेत. मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियासारख्या संघर्षग्रस्त क्षेत्रातील हवाई युद्धावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

"भारताने केलेल्या हल्ल्याचे आणि पाकिस्तानमधील लक्ष्य करण्यात आलेल्या दहशतवादी ठिकाणांचे पुरावे सादर केले आहेत. भारताने जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईलद्वारे कराची येथील मालिर छावणीवर अचूक हल्ला केला", अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आल्याचा उल्लेख कूपर यांनी केला आहे.

दरम्यान, भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५१ नागरिक आणि लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने कबुली दिली आहे. यात ११ सैनिक आणि ४० नागरिक असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानातील नूर खान हवाई तळाचे मोठे नुकसान झाले असून, हे विमानतळ काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT