Adampur Air Base: '..दहशतवाद्यांना घरात घुसून ठेचले जाईल'! PM मोदी यांची गर्जना; जवानांशी साधला संवाद

Narendra Modi Adampur Air Base: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पाठीवर पंतप्रधानांनी शाबासकीची थाप दिली आहे.
PM Narendra Modi Adampur Air Base
PM Narendra Modi Adampur Air BaseDainik Gomantak
Published on
Updated on

जालंधर: ‘‘दहशतवादाविरोधात आम्ही लक्ष्मण रेषा आखली असून आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर ही आमच्यासाठी सामान्य बाब आहे. पाकिस्तानमध्ये कोठेही दहशतवादी शांततेत राहू शकणार नाही, घरामध्ये घुसून त्यांना ठेचले जाईल,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे काढले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पाठीवर खुद्द पंतप्रधानांनी शाबासकीची थाप दिली आहे. आदमपूर येथील हवाई तळास भेट देत मोदी यांनी जवानांशी संवाद साधला.

PM Narendra Modi Adampur Air Base
Ceasefire:..तर अणुयुद्ध झाले असते, लाखो लोक मेले असते! 'भारत-पाक' तणावावरती ट्रम्प यांचे प्रतिपादन

पाकव्याप्त काश्‍मीर मिळविण्याचा उद्देश

व्यापार रोखण्याच्या धमकीमुळेच भारत पाकिस्तानचा संघर्ष थांबला, हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान अमेरिकेशी झालेली चर्चा केवळ लष्करी मुद्द्यांवर होती. त्यात व्यापाराचा कोणताही विषय नव्हता, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, जम्मू-काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे भारताचे धोरण कायम असून पाकव्याप्त काश्‍मीर परत मिळविण्याची भूमिकाही कायम असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

PM Narendra Modi Adampur Air Base
India Pakistan Tension: म्हणे, S-400 सिस्टिम उद्ध्वस्त केली, पाकड्यांचं खोटं पुन्हा भारतानं पकडलं; PM मोदींनी फोटो केले शेअर

मोदी म्हणाले...

भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान जखमी

पुन्हा हल्ला केल्यास सडेतोड प्रत्युत्तर

पाकच्या विनवणीनंतर भारतीय जवान थांबले

पाकचे हल्ले हवाई दलाने निष्प्रभ ठरविले

हवाई दलाकडे डेटा अन् ड्रोनचे शस्त्र

पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com