Pahalgam Attack Dainik Gomantak
देश

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका, कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' 5 मोठे निर्णय

Cabinet Decisions After Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर भारत सरकारने वेगवान हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर भारत सरकारने वेगवान हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानचा भारतातील उच्चायुक्त बंद करण्याचा निर्णय सरकारने घेत पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे.

भारतातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनाही ४८ तासांमध्ये देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्याबरोबरच इतरही काही महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेत सरकारने ‘दहशतवाद सहन केला जाणार नाही’ असा पाकिस्तानला खणखणीत इशारा दिला आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते. केंद्र सरकारनेही या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी मंगळवारीच काश्‍मीरमध्ये जात परिस्थितीचा आढावा घेतला, तर दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी एकाच दिवसात परतले.

मोदींच्या उपस्थितीत आज संध्याकाळी संरक्षणविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील सुरक्षा समितीच्या बैठकीसाठी तातडीने मायदेशी बोलावून घेण्यात आले होते. पहलगाम येथे जाऊन आलेल्या शहा यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती सुरक्षा समितीला दिली.

बैठकीत घेतले 'हे' 5 निर्णय

  • सिंधू पाणीवाटप करार स्थगित

  • अटारी सीमेवरील तपास नाका बंद

  • पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा नाही

  • उच्चायुक्तालयातील लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागार पदे रद्द

  • उच्चायुक्तालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० वर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT