Noida

 

Dainik Gomantak 

देश

Noida: नाईट कर्फ्यूमध्ये जेवण देण्यास नकार दिल्याने मालकाची गोळ्या झाडून हत्या

नोएडामध्येही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान जेवण देण्यास नकार दिल्याने ग्रेटर नोएडामध्ये एका रेस्टॉरंट मालकाची दोन व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

दैनिक गोमन्तक

Noida: जगभरात काही अशा घटना घडतात की ज्याने माणुसकीवरचा विश्वासच उडून जातो. अशीच घटना घडली आहे नोएडामध्ये. सध्या ओमिक्रॉन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात येत आहे.नोएडामध्येही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान जेवण देण्यास नकार दिल्याने ग्रेटर नोएडामध्ये एका रेस्टॉरंट मालकाची दोन व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

नोएडामध्ये रेस्टॉरंट मालकाने नाईट कर्फ्यू असल्याने रात्री 11 ते पहाटे 5 यावेळेत जेवण देण्यास नकार दिल्याने दोन पुरुषांनी गोळ्या घालून त्याला ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल असे मालकाचे नाव आहे. तो 27 वर्षीय हापूरचा रहिवासी होता आणि नोएडामध्ये भोजनालय चालवत होता. रेस्टॉरंट बंद असल्याने तो त्यांना जेवण देऊ शकणार नाही, अशी माहिती त्याने दोघांना दिली. यावरून जोरदार वादावादी झाली, त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. पहाटे 3.30 च्या सुमारास ते बंदूक घेऊन रेस्टॉरंटमध्ये परतले आणि त्यांनी रागाच्या भरात कपिलवर गोळी झाडली.

त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. आकाश आणि योगेंद्र अशी त्या दोन आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

Goa Accident: मद्यधुंद कारचालकाने दिली मांडवी पुलावर धडक! तिघे जखमी, एकाचा मृत्यू; संशयिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्‍चित

"पांडुरंग हरी"! गोव्यात पहिल्यांदाच होणार विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा; म्हापशातील देवस्थानात रंगणार शतकोत्सव कार्यक्रम

Damu Naik: भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांची वर्षपूर्ती आणि फोंड्याची पोटनिवडणूक

Chimbel Protest: गोव्यातील आदिवासींनी ‘ग्रामीणपणा’ हाच आपला धर्म मानला, म्हणून ही माळराने शाबूत राहिली आहे; 'चिंबलचा संघर्ष'

SCROLL FOR NEXT