Arunachal Pradesh Fire Dainik Gomantak
देश

700 Shops Burnt In Arunachal: तब्बल 700 दुकाने आगीत जळून खाक; फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय

अरूणाचल प्रदेशातील सर्वात जुन्या बाजारपेठेतील घटना; कोट्यवधींचे नुकसान, जीवितहानी नाही

गोमन्तक डिजिटल टीम

700 Shops Burnt In Arunachal: अरूणाचल प्रदेशची राजधानी ईटानगरपासून १४ किलोमीटरवर असलेल्या नाहरलगून येथील बाजारपेठेत लागलेल्या आगीत तब्बल 700 दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवीतहानीचे कोणतेही वृत्त नाही.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविले गेले आहे. सर्व दुकाने बांबू आणि लाकडाची असल्याने तसेच सर्व दुकानांतील साहित्य देखील कोरडे असल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले. आगीमुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

इटानरगचे पोलिस अधीक्षक जिम्मी चिराम म्हणाले की, ही बाजारपेठ राज्यातील सर्वात जुनी बाजारपेठ आहे. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दिवाळीनिमित्त लावलेल्या पणत्यांमुळे किंवा फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा संशय आहे. दुकानदारांनी जे शक्य आहे ते वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि, गॅस सिलिंडरच्या भडक्यांमुळे आग पसरत गेली.

दरम्यान, स्थानिक व्यापाऱ्यांनी आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला फोन केला होता, पण तिथे कर्मचारी नव्हते, तसेच अग्निशमन दलाच्या गाडीत पाणी नव्हते, असे आरोप केले आहेत. त्यामुळे या गाड्यांना घठनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. तोपर्यंत आग संपुर्ण बाजारात पसरली होती. पोलिसांनीही तत्काळ कार्यवाही केली नाही, असेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

दुकानदारांशी केलेल्या चर्चेनंतर अरुणाचल चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तारा नाचुंग यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

SCROLL FOR NEXT