Opposition to conduct mock parliament to question BJP government Twitter @ANI
देश

मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची 'समांतर सांसद'

या बैठीकीत विरोधक सरकार विरोधात संसदेबाहेर प्रति समांतर सांसद(Mock Parliament) घेण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

जुलै महिन्यात सुरु झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशनाचे(Monsoon Session) कामकाज पूर्णपणे चालताना दिसत नाही. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला(Modi Government) घेरतात दिसत आहेत. त्यातच सरकारने पेगासेस(Pegasus) प्रकरणावर संसदेत(Parliament Session) चर्चा करण्यास विरोध दर्शवल्याने तर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत.त्याचबरोबर कृषी कायद्यावरूनही(Farmers Bill) विरोधक सरकारला पाहिल्या दिवसापासून घेरताना दिसत आहेत. त्यावरच आता या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ, विरोधी पक्ष उद्या एक बैठक घेणार आहेत. आणि या बैठीकीत विरोधक सरकार विरोधात संसदेबाहेर प्रति समांतर सांसद(Mock Parliament) घेण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. याबाबत सूत्रांच्या माहिती नुसार उद्या जवळपास 14 पक्ष एकत्रित बैठक घेणार आहेत.

उद्या सकाळी 10 वाजता राज्यसभा(Rajyasabha) आणि लोकसभेच्या(Loksabha) विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीतच राहुल गांधींच्या(Rahul Gandhi) उपस्थितीत समांतर संसद अधिवेशन चालवण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणारा असल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे सध्याचे संसदेचे अधिवेशन 19 जुलैपासून सुरू आहे. या सत्रात सतत गदारोळ होतोना पाहायला मिळत आहे . विरोधक शेतीशी संबंधित तीनही कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत तसेच पेगासस हेरगिरी घोटाळ्यावर सरकारशी चर्चा करण्याची मागणीही उपस्थित करत आहेत. दोन्ही मुद्यांवर दररोज सभागृहात गोंधळ सुरू आहे आणि कामकाज सातत्याने तहकूब केले जात आहे.

सरकार आपल्या मर्जीनुसार विधेयक संमत करू इच्छित आहे आणि महागाई, पेगासस किंवा कृषी कायदा यासारख्या मुद्द्यांपासून पळ काढत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. या गदारोळाच्या दरम्यान, विरोधी पक्ष आता संसदेबाहेर समांतर अधिवेशन चालवण्याच्या विचारात असल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान यापूर्वी राहुल गांधी यांनीही सरकारला इशारा दिला होता की 'जमत नसेल तर कामकाज तहकूब करा'विरोधी पक्षांच्या यपूर्वी झालेल्या बैठकी नंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी म्हटलं होत की, 'पेगासस प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. याबाबत 14 पक्षांकडून नोटीस दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुसाट...! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

Shani Margi 2025: कर्मफल दाता शनीची चाल 138 दिवसांनंतर बदलली! 'या' 5 राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, नोकरीत बढतीचाही योग

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

SCROLL FOR NEXT