Indian armed forces latest attack Dainik Gomantak
देश

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' नावामागे लपलाय एक संदेश; काय आहे कारण?

Operation Sindoor Name Meaning: भारतीय सशस्त्र सेनेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.

Akshata Chhatre

नवी दिल्ली: दोन आठवड्यांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हवाई हल्ला करत पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिले आहे. भारतीय सशस्त्र सेनेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले. या कारवाईत भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांचे म्होरके आणि त्यांच्या ठिकाण्यांना लक्ष्य केले.

'सिंदूर' नाव का?

'ऑपरेशन सिंदूर' या नावामागे एक खास भावना आहे. सिंदूर विवाहित हिंदू महिला वापरतात आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर या नावामागे पहलगाम हल्ल्यातील पीडित पुरुषांना श्रद्धांजली अर्पण करण्याची भावना आहे. हल्लेखोरांनी पीडितांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून त्यांची हत्या केली होती, असे वृत्त आहे. त्यामुळे, 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव त्या बळींच्या स्मरणार्थ आणि न्यायासाठी उचललेले पाऊल असल्याचे मानले जातेय.

भारत सरकारने या कारवाईची माहिती देताना सांगितले की, २२ एप्रिल रोजी बाईसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे आणि या हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्धार भारताने केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवले होते. गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले असताना आता ही कारवाई करण्यात आली आहे.

दहशतवाद संपवणे हाच कारवाईचा उद्देश:

भारतीय सुरक्षा दलांनी या कारवाईत प्रमुख दहशतवादी संघटनांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या पायाभूत सुविधांना नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले. जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर (पाकिस्तान) येथील तळ आणि लष्कर-ए-तैयबाचे मुरीदके (पंजाब प्रांत) येथील मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. या दोन्ही संघटनांवर यापूर्वीही अनेक सीमापार हल्ल्यांचा आरोप आहे आणि पहलगाम हल्ल्यातही त्यांचा थेट सहभाग असल्याचे मानले जाते.

भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही कारवाई अत्यंत अचूक आणि मर्यादित स्वरूपाची होती. केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि यामध्ये सामान्य नागरिकांनया कोणतीही हानी पोहोचलेली नाही. ही कारवाईदहशतवाद्यांना कठोर संदेश देणारी आहे, असे भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया काय?

पाकिस्तानच्या लष्कराच्या जनसंपर्क विभागाने भारताच्या हवाई हल्ल्यांची पुष्टी केली आहे. बहावलपूर (पंजाब प्रांत), कोटली आणि मुजफ्फराबाद (पाक-व्याप्त काश्मीर) येथे हल्ले झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून याला 'युद्धाचा कृत्य' असे संबोधले असून त्यांनी भारताला कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT