Tirath Singh Rawat  Dainik Gomantak
देश

Uttarakhand: 'कमिशनशिवाय काम होत नाही...,' माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

दैनिक गोमन्तक

Tirath Singh Rawat Viral Video: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, कमिशन दिल्याशिवाय राज्यात कोणतेही काम होऊ शकत नाही. पौडीचे लोकसभा खासदार तीरथ सिंह रावत यांचा हा व्हिडिओ कधीचा आहे हे माहीत नाही, पण त्यात भाजप नेते एका खोलीत बसून राज्यातील 'कमिशन'बाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान, आपल्या वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले रावत म्हणाले की, 'मी मुख्यमंत्री राहीलो आहे, आणि मी हे बोलण्यास कदापि कचरत नाही की, जेव्हा उत्तराखंड (Uttarakhand) उत्तर प्रदेशपासून वेगळे झाले तेव्हा एखादे काम करण्यासाठी इथे 20 टक्के कमिशन द्यावे लागल होते.'

रावत पुढे म्हणाले की, 'उत्तर प्रदेशपासून वेगळे झाल्यानंतर कमिशन पध्दत बंद व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने आजही ती सुरु आहे. ही पध्दत 20 टक्के कमिशनने (Commission) सुरु झाली होती.' 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशपासून वेगळे होऊन उत्तराखंड अस्तित्वात आले. रावत पुढे म्हणाले की, 'मला सांगण्यात आले की, इथे कमिशन दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कमिशनिंग प्रचलित होते, आणि दुर्दैवाने ते आता उत्तराखंडमध्येही सुरु आहे."

दुसरीकडे, याला कोणीही जबाबदार नसल्याचे रावत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'ही एक मानसिकता आहे. हे आपले राज्य आहे, ही भावना निर्माण होईल तेव्हाच हे ठीक होईल.'

यापूर्वीही माजी मुख्यमंत्री प्रसिद्धीच्या झोतात आले होते

यापूर्वीही माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. गेल्या वर्षी मार्चमध्येही फाटलेल्या जीन्स घातलेल्या तरुणांबाबत केलेल्या वक्तव्याने रावत चर्चेत आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT