Presidential Election 2022 Dainik Gomantak
देश

Presidential Election 2022: ओमप्रकाश राजभर यांची राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी घोषणा

निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

दैनिक गोमन्तक

ओम प्रकाश राजभर यांनी शुक्रवारी राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. सुभासपाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर (om prakash rajbhar) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यापैकी कोणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट केले आहे. (Presidential Election 2022 News)

शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुभासप प्रमुख म्हणाले, "राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमचा पक्ष द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देईल. आमचे 6 आमदार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022) आम्ही आमच्या आमदारांशी चर्चा केली आहे. याशिवाय आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ. याशिवाय पक्षातील नेत्यांशी देखिल चर्चा केली आहे.

सुभाषसपा प्रमुख काय म्हणाले?

ते म्हणाले की, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी द्रौपदी मुर्मूच्या आगमनावेळी आम्हाला डिनरसाठी बोलावले होते. मी मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचवेळी द्रौपदी मुर्मूने आमचा पाठिंबा मागितला होता. त्याचवेळी मी लखनौ दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठिंबा देण्यासाठी फोन आला होता. दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अमित शहा (Amit Shah) यांची भेट झाली.

याआधी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू लखनऊमध्ये आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी डिनरचे आयोजन करण्यात आले होते . ज्यामध्ये ओमप्रकाश राजभर देखील सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतर ओपी राजभर यांच्या मुलाने डिनरला जाण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT