Balasore Train Accident Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident: ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल इटलीच्या दूतावासाने व्यक्त केला शोक

ओडिशाच्या बालासोरमध्ये मालगाडीला धडकल्यानंतर शुक्रवारी (2 जून) ला कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरल्यामुळे 233 जणांचा मृत्यू तर 900 अधिक लोक जखमी झाले आहेत

Puja Bonkile

Odisha Train Accident: हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहे. 

आज शनिवारी (3 जून) सकाळपर्यंत मदत यंत्रणांचे बचावकार्य सुरू असून, त्यामध्ये रेल्वेच्या बोगीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच इटलीतील दूतावासाने देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि भारतातील लोकांप्रती इटलीतील दूतावासाने देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 वाजता हा अपघात झाला. बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.

ओडिशाच्या (Odisha) राज्य माहिती आणि जनसंपर्क विभागाने अधिकृत रीलिझमध्ये म्हटले आहे की, बालासोर येथील दुःखद रेल्वे अपघाताच्या (Accident) पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसीय दुखवटा जाहिर केला आहे. त्यामुळे 3 जून रोजी राज्यभर कोणताही उत्सव साजरा केला जाणार नाही.

तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, यासारख्या अनेक नेत्यांनी सोशल मिडियावर ट्विट करत घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्विट करत लिहिले की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अपघाताबाबत सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य राबविण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी साह्य देण्यात येईल'.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपगातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईंकांना 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर, अपघातामधील गंभीर जखमींना 2 लाख रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.

घटनास्थळी NDRF, स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती बचाव पथके आणि इतर सहाय्यक संस्था हजर आहेत. सतत मदत आणि बचाव कार्य करत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

VIDEO: हॉर्मुझची सामुद्रधुनी बनली 'युद्धभूमी'! इराणी नौदलाला अमेरिकेचा मोठा दणका, 16 जहाजे केली उद्ध्वस्त; थरारक व्हिडिओ व्हायरल

Panaji Election: पणजीवासीय सूज्ञपणा दाखवतील का? सडेतोड नायक Watch Video

Mhaje Ghar: 'म्हजे घर'बाबतीत नवी अपडेट! सुनावणी 1 एप्रिलपर्यंत लांबणीवर; याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर सरकारचा आक्षेप

Human Wildlife Conflict Goa: मानव-वन्‍यप्राणी संघर्ष टाळण्‍यासाठी धोरण! कर्नाटक, केरळच्‍या मॉडेलचा अभ्‍यास करणार असल्‍याची माहिती

SCROLL FOR NEXT