Odisha Train Acciden Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident: ओडिशातील रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू; राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर

ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून) रात्री झालेल्या भयंकर अपघातामुळे एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Coromandel Express Derail: हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहे. 

आज शनिवारी (3 जून) सकाळपर्यंत मदत यंत्रणांचे बचावकार्य सुरू असून, त्यामध्ये रेल्वेच्या बोगीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. 

तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 वाजता हा अपघात झाला. बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.

ओडिशाच्या (Odisha) राज्य माहिती आणि जनसंपर्क विभागाने अधिकृत रीलिझमध्ये म्हटले आहे की, बालासोर येथील दुःखद रेल्वे अपघाताच्या (Accident) पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसीय दुखवटा जाहिर केला आहे. त्यामुळे 3 जून रोजी राज्यभर कोणताही उत्सव साजरा केला जाणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्विट करत लिहिले की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अपघाताबाबत सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य राबविण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी साह्य देण्यात येईल'.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपगातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईंकांना 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर, अपघातामधील गंभीर जखमींना 2 लाख रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.

घटनास्थळी NDRF, स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती बचाव पथके आणि इतर सहाय्यक संस्था हजर आहेत. सतत मदत आणि बचाव कार्य करत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT