Right To Vote Dainik Gomantak
देश

आता ऑनलाईन बदलता येणार Voter ID Card मधील अ‍ॅड्रेस

दैनिक गोमन्तक

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Election 2022) होत आहेत. दर पाच वर्षांनी देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत तुमचे मतदार ओळखपत्र पूर्णपणे ठीक असणे महत्त्वाचे आहे. मतदार ओळखपत्र हे निवडणुकीच्या काळात आपल्याला मतदानाचा हक्क (Right To Vote) बजावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून उपयोगी पडते. मात्र केवळ मतदानाच्या दिवशीच नाही, तर प्रत्येक भारतीयाला त्याच्या ओळखीसाठी मतदार ओळखपत्र आवश्यक असते. यासोबतच आपण रहिवासी पुरावा म्हणूनही या ओळपत्राचा वापर करतो. (Now The Address In The Voter ID Card Can Be Changed Online)

दरम्यान, अशा परिस्थितीत मतदार ओळखपत्रात तुमचा पत्ता टाकण्यात काही चूक झाली असेल किंवा घर किंवा लग्नानंतरचा पत्ता बदलला असेल, तर तुम्हाला मतदार ओळखपत्रात आवश्यक ती दुरुस्ती करावी लागते. यासाठी आता रांगेत उभे राहून लांबलचक प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही, तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून आवश्यक ते बदल करु शकता.

तसेच, तुम्ही तुमचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉपद्वारे ऑनलाइन माध्यमातून मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलू शकता. यासाठी, तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर प्रथम जावे लागेल त्यानंतर तुम्हाला मतदार ओळखपत्रामध्ये बदल करता येईल.

या टीप्स फॉलो करा

  • सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर जा, म्हणजे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल- www.nvsp.in.

  • त्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल.

  • नोंदणी केल्यानंतर, आता पोर्टलवर लॉग इन करा.

  • मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला 'migration to another place' या ठिकाणी जावे लागेल.

  • आता तुमच्या स्वतःच्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलण्यासाठी 'सेल्फ' पर्याय निवडा.

  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला 'फॅमिली' पर्याय निवडावा लागेल.

  • या निवडणुकीनंतर स्क्रीनवर फॉर्म 6 दिसेल, ज्यामध्ये पत्ता बदलण्यासाठी काही महत्त्वाची माहिती मागितली जाईल.

  • सर्व माहिती प्रविष्ठ केल्यानंतर, तुम्हाला पुष्टीकरण बटणावर क्लिक करावे लागेल.

  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पत्त्यावर नवीन मतदार ओळखपत्र येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT