Now reach Ayodhya via Bullet Train Dainik Gomantak
देश

प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी आता बुलेट ट्रेन!

दिल्ली ते वाराणसी या मार्गावर बुलेट ट्रेन ( Bullet Train) प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, सप्टेंबरपर्यंत याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमन्तक

देशात अनेक दिवसांपासून बुलेट ट्रेन (Bullet Train) येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहेच मात्र ही चर्चा सत्यात कधी येणार आणि याला नेमका किती कालावधी लागेल याबाबत अनिश्चितता आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीचे (Mumbai to Ahmadabad Bullet Train) बरचसे कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत अशातच देशात इतर ठिकाणीही बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे. आणि अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांच्या मतदार संघातसुद्धा बुलेट ट्रेन नेण्याची योजना आखली जात आहे.वाराणसीत (Varanasi) ही ट्रेन जाईल असे बोलले जात आहे. (Now reach Ayodhya via Bullet Train)

दिल्ली ते वाराणसी या मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, सप्टेंबरपर्यंत याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात बुलेट ट्रेनचे प्रकल्प राबवत असलेल्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे . दिल्ली पासून पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीपर्यंतच्या 865 किमी मार्गावर ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. आणि यारूनच आता भाविक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथाचे दर्शन बुलेट ट्रेनने जाऊन करू शकतात, असे स्पष्ट होत आहे.

या बुलेट ट्रेनसाठी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 12 स्थानके निश्चित करण्यात येणार आहेत. दिल्लीहून सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी नोएडा, मथुरा, आग्रा, इटावा, कन्नौज, लखनऊ, अयोध्या, रायबरेली, प्रयागराज, भदोही आणि वाराणसी अशी स्थानके नेमण्यात आली आहेत. या ट्रेनमुळे दिल्ली ते वाराणसीचे अंतर 4 तासांत पूर्ण होऊ शकेल, दिल्ली ते अयोध्या आणि पुढे वाराणसीला जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकणार आहे. यमुना एक्स्प्रेस वेवरील प्रस्तावित जेवर एअरपोर्टशी ही बुलेट ट्रेन कनेक्ट करण्याचा मानस आहे.

दरम्यान इतरही बऱ्याच ठकाणी बुलेट ट्रेन सुरू होणार आहेत, देशातील अनेक महत्वाची शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा सरकारचा मानस असल्याचा बोलले जात आहे.ज्यामध्ये वाराणसी-हावडा, मुंबई-नागपूर , दिल्ली-अहमदाबाद, चेन्नई-म्हैसूर, दिल्ली-अमृतसर , मुंबई-हैदराबाद या मार्गांचा समावेश असणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT