Nitish Kumar & PM Modi
Nitish Kumar & PM Modi Dainik Gomantak
देश

Agniveer Scheme: ‘’अग्निवीर योजनेला खूप विरोध झाला...’’; शपथविधीपूर्वीच नितीश कुमारांच्या पक्षाने सोडला बाण

Manish Jadhav

Agniveer Scheme: यंदाची लोकसभा निवडणूक अभूतपूर्व ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार अशा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला गेला होता. पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीत 400 पार चा नारा दिला होता. मात्र निकालानंतर भाजपच्या 400 पार च्या नाऱ्याला मतदारांनी प्रतिसाद दिला नाही. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये भाजपला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. निकालानंतर आता भाजपवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याची वेळ आली आहे. यंदाच्या निवडणुकीत मोदींचा करिष्मा दिसला नाही. भाजपला स्वबळावर केवळ 240 जागाच मिळवता आल्या. दुसरीकडे, इंडिया आघाडीने निवडणुकीत चांगली कामगिरी केली.

दरम्यान, भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने नरेंद्र मोदींना आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवावे लागणार आहे. आतापर्यंत सरकार (Government) स्थापनेबाबत कोणतीही रुपरेषा ठरलेली नसून, नितीश कुमार यांच्या पक्षाने आधीच आपल्या भात्यातून बाण सोडला आहे. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी गुरुवारी अग्निवीर योजनेत बदल करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘’अग्नवीर योजनेला खूप विरोध झाला आणि त्याचा परिणामही निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.’’

केसी त्यागी यांनी 'आज तक'शी बोलताना सांगितले की, जेव्हा ही योजना आणली गेली तेव्हा खूप विरोध झाला. लष्करात तैनात असलेल्या सैनिकांचे कुटुंबीयही यामुळे संतापले होते. त्यामुळे यामध्ये बदल व्हायला हवा. समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर विचारले असता, नितीश कुमार यांच्या पक्षाने सांगितले की, आम्ही याच्या समर्थनात आहोत. मात्र याबाबत सर्व संबंधित पक्षांचे मत घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा. त्यागी पुढे म्हणाले की, यापूर्वीही आमची ही भूमिका होती आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहोत.

एक देश, एक निवडणूक (Election) या मुद्द्यावर पाठिंबा देण्याबाबतही ते बोलले. यापूर्वीही आम्ही या मुद्द्यावर एकत्र होतो, असे जेडीयूने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत, तर जेडीयूला 12 जागा मिळाल्या आहेत. आंध्र प्रदेशातील टीडीपीला 16 जागा मिळाल्या आहेत. आता या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. नरेंद्र मोदी 8 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : ‘कल्‍की’मध्‍ये चमकतोय गोमंतकीय ‘ध्रुव’ तारा; छोडी पण महत्वपूर्ण भूमिका

Vijay Sardesai : विजय सरदेसाई यांनी ऐकली काणकोणवासीयांची गाऱ्हाणी

Mapusa Municipal Market : म्हापशात भिकाऱ्यांमध्ये वाढ; समस्या सोडवण्याची मागणी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT