President Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

Lucknow Rename: आता लखनऊचे नाव बदलणार? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानंतर...

Manish Jadhav

Lucknow Rename Row: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज लखनऊचा उल्लेख लक्ष्मणनगरी आणि लखनपुरी असा केला. मुर्मू यांनी लखनऊचे भगवान लक्ष्मण यांच्याशी असलेले संबंध सांगितले. यापूर्वी, भाजप खासदाराने लखनऊचे नाव बदलून लक्ष्मणनगरी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, प्रतापगडचे खासदार संगम लाल गुप्ता यांनी नुकतेच लखनऊचे (Lucknow) नाव बदलून लक्ष्मणनगरी किंवा लखनपुरी करण्याची मागणी केली होती. भाजप खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लखनऊचे भगवान लक्ष्मण यांच्याशी कनेक्शन सांगितले आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, "या शहराचे नाव भगवान रामाचे धाकटे बंधू लक्ष्मण यांच्या नावावरुन ठेवण्यात आले होते, असे म्हटले जाते. 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत या शहराला लखनपूर म्हणण्याची परंपरा चालू होती. दुसरीकडे, हे संस्कृतीचे प्रमुख केंद्र राहिले आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT