Now Get Covid19 Vaccination Certificate on WhatsApp
Now Get Covid19 Vaccination Certificate on WhatsApp Dainik Gomantak
देश

COVID-19: आता व्हॉट्सॲपवरूनच मिळवा लसीकरण प्रमाणपत्र

दैनिक गोमन्तक

अनेकांना त्यांचे कोविड लसीकरण(Covid19 Vaccination) झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे हे माहिती नाही. किंवा त्या संबंधित ॲपवर जाऊन ते डाउनलोड कसे करायचे याबाबत ही अनेकांना संभ्रम आहे. मात्र आता हे सगळे खूप सोपे झाले आहे कारण आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरूनच कोरोना लसीचे प्रमाणपत्र (Covid19 Vaccine Certificate) काही मिनिटांत सहज मिळवू शकणार आहात यासाठी तुम्हाला तीन सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. केंद्रीय आरोग्य मंत्री (Health Minister) मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.(Now Get Covid19 Vaccination Certificate on WhatsApp)

काय आहे पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या-

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +91 9013151515 हा नंबर सेव्ह कराव लागेल. पण इथे मात्र एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की हा नंबर तुम्ही लस घेताना प्रविष्ट केलेल्या त्याच मोबाईल नंबरवर सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यांनतर व्हॉट्सॲपवर जाऊन चॅट बॉक्सवर covid certificate असे टाईप करा. हे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल. हा OTP व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा. लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा OTP फक्त 30 सेकंदांसाठी असेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

दरम्यान देशात कोविड -19 लसीकरणाचा नवीन टप्पा 21 जूनपासून सुरू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड -19 लसीचे 52.37 कोटीहून अधिक डोस प्रदान केले गेले आहेत. सध्या, आणखी 8,99,260 लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आज भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 39070 नवीन प्रकरणे आल्यानंतर, संक्रमणाची प्रकरणे वाढून 3,19,34,455 झाली, तर आणखी 491 लोकांच्या मृत्यूमुळे लोकांची संख्या 4,27,862 झाली. रविवारी सकाळी 8 पर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, कोविड -19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,06,822 वर आली आहे, जी संक्रमणाच्या एकूण प्रकरणांच्या 1.27 टक्के आहे. कोरोना व्हायरसपासून राष्ट्रीय पुनर्प्राप्तीचा दर 97.39 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT