Covaxin आणि Covishield लसीचा मिश्रित डोस प्रभावी; ICMR चा दावा

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने एक अतिशय महत्वाची माहिती शेअर केली आहे.
Coronavirus vaccination
Coronavirus vaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

संपूर्ण जग कोरोनाला (Coronavirus) हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वेगवेगळ्या लसींच्या वापराबाबत जगभरात अनेक चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने एक अतिशय महत्वाची माहिती शेअर केली आहे. (Mix dose of Covaxin and Covishield vaccine is effective, ICMR claims)

Coronavirus vaccination
राहुल गांधींचे अकांउंट सस्पेंड केलेच नाही: ट्विटर

आयसीएमआरने एका निवेदनात म्हटले आहे की, कोवॅक्सीन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) कोरोना लसीच्या मिश्रित डोसवर केलेल्या अभ्यासाचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने दावा केला की कोवॅक्सीन आणि कोविशील्डच्या कॉकटेलवरील अभ्यासामुळे चांगले परिणाम दिसून आले आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ही लस केवळ सुरक्षित असल्याचे आढळले नाही तर ॲडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म-आधारित लसीच्या संयोजनासह चांगले प्रतिरक्षाक्षमता देखील दर्शवली.

गेल्या महिन्यात, भारतातील औषध नियामक डीसीजीआई (DCGI) च्या तज्ज्ञ समितीने कोविशील्ड आणि कोवॅक्सीन कोरोना लसीच्या मिश्रित डोसवर अभ्यास करण्याची शिफारस केली. वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने (सीएमसी) अशा अभ्यासासाठी परवानगी मागितल्यानंतर ही शिफारस समोर आली होती.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ज्ञ समितीने म्हटले होते की, या अभ्यासाचा उद्देश एखाद्या व्यक्तीला लसीकरण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देता येतील काह?. जर कोणाला कोविशिल्डचा एक डोस आणि कोवॅक्सीनचा एक डोस दिला गेला तर ते कार्य करेल का? अभ्यासात उघड झालेल्या परिणामांनी आज हे स्पष्ट केले आहे की कोविशील्ड-कोवाक्सिनचा मिश्रित डोस देखील प्रभावी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com