Shahbad Dairy Murder Case: दिल्लीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येतील आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
'हत्येवेळी वापरलेले हत्यार जप्त करणे आणि गुन्ह्याचे दुवे जोडणे यासाठी पोलिसांनी आरोपी साहिलची कोठडी मागितली होती, त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.
आता या खून प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. प्रवीणनंतर आता एका नव्या पात्राचा प्रवेश झाला आहे.
साहिलने यापूर्वी पोलिस चौकशीत सांगितले होते की, त्याची प्रेयसी साक्षीची एक्स बॉयफ्रेंड प्रवीणसोबत पुन्हा मैत्री झाली होती. पीडितेने प्रवीणशी पुन्हा बोलणे सुरू केले तेव्हा ते साहिलच्या पचनी पडले नाही. म्हणूनच खून केला.
आता पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी साहिलने मुलीचे जबलू नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले आहे.
जबलू हा गुंड असल्याचे साहिलने सांगितले. जबलूने साहिलला पीडितेपासून दूर राहण्यास सांगितले होते. साहिलला वाटत होतं की जबलू त्याला मारेल. म्हणून साहिलनेच विचार केला की स्व:ताच मैत्रिणीला का मारू नये. जबलूमुळे पीडिता साहिलपासून दूर गेली होती.
16 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिलला पोलिसांनी सोमवारी बुलंदशहर येथून अटक केली.
साहिलची मेडिकल चाचणी बुलंदशहर येथील पहासू सीएचसी येथे करण्यात आली, जेथे वैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले की साहिलला वैद्यकीय दरम्यान केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही.
साहिलच्या चेहऱ्यावर काहिच प्रतिक्रीया नव्हत्या असं डॉक्टर सांगतात. त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप दिसत नव्हता. प्रत्येक प्रश्नाला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.
नाव, वडिलांचे नाव, वय, पत्ता, जन्मखूण असे प्रश्न त्याला विचारण्यात आले, ज्याला तो अतिशय उद्धटपणे उत्तरे देत होता. साहिलच्या शरीरावर जखमेच्या ताज्या खुणा नव्हत्या.
दिल्लीतील शाहबाद येथे राहणारा आरोपी साहिल याने 28 मे रोजी आपल्या 16 वर्षीय मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या केली होती. डोक्यात मोठा दगडही मारला गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला साहिल तरुणीवर वार करताना दिसत आहे. हत्येच्या वेळी लोक तेथून जात होते, मात्र ते प्रेक्षकच राहिले आणि आरोपी पीडितेला चाकू मारत राहिले.
गडद लाल शर्ट घातलेल्या एकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरी साहिलने त्याला ढकलून दिले. व्हिडिओमध्ये, साहिल मुलीला चाकूने मारहाण करत आहे, तसेच ते बाजूला उभ्या राहणाऱ्यांना धमकावत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.