Mumbai Blast : 26/11 हल्ल्यातील दहशतवाद्याचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू

Mumbai Terror Attack: दहशतवादी भुट्टावीच्या मृत्यूला भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे, पण या प्रकरणाची सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याचेही सांगितले आहे.
Man behind Mumbai Terror Attack Dies in Pakistan.
Man behind Mumbai Terror Attack Dies in Pakistan.Dainik Gomantak.
Published on
Updated on

दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानमधील तुरुंगात मृत्यू झाला आहे. अब्दुल सलाम भुट्टावी याने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तयार करण्यात मदत केली होती. तो टेरर फंडींग प्रकरणी पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. तो 20 वर्षांपासून लष्कर-ए-तैयबासाठी निधी उभारणी, दहशतवाद्यांची भरती आणि प्रबोधनासाठी जबाबदार होता.

अब्दुल सलाम भुट्टावीला 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. बर्‍याच वर्षांनंतर, भुट्टावीला पाकिस्तानने टेरर फंडींगच्या आरोपाखाली अटक केली होती आणि सुमारे 3 वर्षांपूर्वी   हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याच्यासोबत दहशतवादी टेरर प्रकरणात दोषी ठरला होता. भुट्टावीला ऑगस्ट 2020 मध्ये साडे16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद याला 2002 आणि 2008 मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर एलईटीचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम केलेल्या भुट्टावीच्या मृत्यूची घोषणा सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली.

दहशतवादी भुतावीच्या मृत्यूबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने अब्दुल सलाम याचा मृत्यू झाला. लष्करशी संबंधित एका संघटनेने 78 वर्षीय दहशतवादी भुट्टवी याच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओही जारी केला आहे. लाहोरजवळील मुरीदके येथील दहशतवादी गटाच्या 'मरकझ' केंद्रात मंगळवारी सकाळी भुटावी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Man behind Mumbai Terror Attack Dies in Pakistan.
Bomb Blast Threat: पाटणा जंक्शन बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांनी आवळल्या धमकी देणाऱ्याच्या मुसक्या

भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनीही दहशतवादी भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मात्र या प्रकरणाची सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याचेही सांगितले आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये, 10 लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केले, ज्यात अमेरिका आणि इस्रायलसारख्या अनेक देशांच्या नागरिकांसह एकूण 166 लोक मारले गेले, तर डझनभर जखमी झाले.

पाकिस्तानने या हल्ल्यांप्रकरणी ऑपरेशन कमांडर झकीउर रहमान लख्वीसह लष्कर-ए-तैयबाच्या सात जणांना अटकही केली होती, परंतु या प्रकरणात विशेष प्रगती झाली नाही.

Man behind Mumbai Terror Attack Dies in Pakistan.
Delhi Murder Case : दिल्ली हत्या प्रकरणातील नराधमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com