Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country. Dainik Gomantak
देश

आता तिकीट कन्फर्म ! 3 हजार गाड्या, 1 हजार कोटी प्रवासी आणि 5 हजार किमी ट्रॅक; वाचा काय आहे रेल्वे मंत्र्यांचा प्लॅन

Ashwini Vaishnav: येत्या काळात देशातील सर्व रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्याची योजना आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यामागचा पूर्ण प्लॅन उघड केला आहे.

Ashutosh Masgaunde

Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country, Says Rail Minister Ashwini Vaishnav:

गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. अनेक किलोमीटरचे नवीन रेल्वे रुळ टाकण्यात आले. अनेक नवीन गाड्या सुरू झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या जगप्रसिद्ध गाड्याही या काही वर्षांत रुळांवर धावल्या आहेत.

आता पुढील पाच वर्षांत आणखी हजारो गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. या योजनेनुसार पुढील पाच वर्षांत तीन हजारहून अधिक गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे.

रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता ८०० कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यासाठी येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.

वैष्णव म्हणाले की, प्रवासाचा वेळ कमी करणे हे त्यांच्या मंत्रालयाचे आणखी एक महत्त्वाचे लक्ष्य आहे. वैष्णव म्हणाले, "सध्या वर्षाला सुमारे 800 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. चार ते पाच वर्षांत ही क्षमता १००० कोटींपर्यंत वाढवावी लागेल कारण लोकसंख्या वाढत आहे."

ते पुढे म्हणाले, "यासाठी आम्हाला तीन हजार जादा गाड्यांची गरज आहे, ज्यामुळे प्रवाशांची ही वाढलेली संख्या सुलभ होण्यास मदत होईल."

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ६९ हजार नवे डबे उपलब्ध असून दरवर्षी रेल्वे सुमारे पाच हजार नवीन डबे बनवत आहे.

सूत्रांनी सांगितले की, या सर्व प्रयत्नांमुळे रेल्वे दरवर्षी 200 ते 250 नवीन गाड्या आणू शकते, जे 400 ते 450 वंदे भारत गाड्यांव्यतिरिक्त आहे. येत्या काही वर्षांत या गाड्या रेल्वेत सामील होणार आहेत.

वैष्णव म्हणाले की, प्रवासाचा वेळ कमी करणे हे रेल्वेचे आणखी एक लक्ष्य आहे, ज्यासाठी मंत्रालय ट्रेनचा वेग सुधारण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे.

वैष्णव म्हणाले की, रेल्वेची क्षमता आणखी वाढवण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच हजार किलोमीटरचे ट्रॅक टाकले जात आहेत. एक हजाराहून अधिक उड्डाणपूल आणि अंडरपासही मंजूर झाले असून अनेक ठिकाणी काम सुरू झाले आहे.

गेल्या वर्षी, आम्ही 1,002 उड्डाणपूल आणि अंडरपास बांधले आणि यावर्षी ही संख्या 1,200 पर्यंत वाढवण्याचे आमचे ध्येय आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी पुढे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT