Bihar CM Nitish Kumar
Bihar CM Nitish Kumar @ANI
देश

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी 9 व्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Manish Jadhav

Bihar CM Nitish Kumar: नितीश कुमार यांनी 9 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव आणि कॉंग्रेस पक्षाची साथ सोडत एनडीएबरोबर हातमिळवणी केली. अशाप्रकारे बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांच्यासह 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, ज्यामध्ये सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय, जितन मांझी यांचे सुपुत्र आणि HAM चे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन, अपक्ष आमदार सुमित सिंह आणि विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, प्रेम कुमार, विजेंद्र यादव यांचा समावेश आहे. शपथविधी समारंभानंतर नितीश मंत्रिमंडळाची पहिली बैठकही आज संध्याकाळी होणार आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच सरकार स्थापनेचा दावा केला होता. विशेष म्हणजे, त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही राज्यपालांना सुपूर्द केले होते. त्यानंतर राज्यपालांनी ताबडतोब नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांना आमंत्रित केले होते. जेडीयू विधिमंडळाच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, महाआघाडी सरकार बरखास्त करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर करण्यात आला आहे. पक्ष सदस्यांच्या मताच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला. आता आम्ही नव्या युतीसह सरकार स्थापन करु. यापूर्वी जेडीयू आमदारांच्या बैठकीत नितीश यांनी सांगितले होते की, त्यांना आरजेडीसोबत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा चिराग पासवान यांच्यासोबत पाटणा येथे पोहोचले.

नितीश कुमार यांच्या नावावर रेकॉर्ड कायम

मुख्यमंत्री नितीश कुमार 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. असे करणारे ते राज्यातील पहिले नेते आहेत. बिहारमध्ये एवढा काळ मुख्यमंत्री बनलेला एकही नेता झाला नाही. गेल्या दोन दशकांत बिहारमधील सत्ताधारी युती बदलत राहिली, पण नितीश कुमार सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT