Nita Ambani Dance Video Dainik Gomantak
देश

Nita Ambani Dance Video: कल्चरल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ,नीता अंबानींचा 'रघुपती राघव' गाण्यावर भन्नाट डान्स

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी नीता अंबानी यांनी 'रघुपती राघव' या गाण्यावर जबरदस्त नृत्य केले.

Puja Bonkile

Nita Ambani Dance Video: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चे 31 मार्च रोजी उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी नवी दालनं खुली होतील असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे. नीता मुकेश अंबानी यांनी कल्चरल सेंटर (NMACC) उद्घाटननिमित्त 'रघुपती राघव राजा राम' वर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडिावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नीता अंबानी यांनी 'रघुपती राघव' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या हा जान्स पाहुन सर्व मंत्रमुग्ध झाले होते. त्या सोशल मिडियार फॅशन आणि सौंदर्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. लाल आणि सोनेरी रंगाचा सुंदर लेहेंगा त्यांनी परिधान केला होता. रघुपती राघव राजा राम हे गाण श्रेया घोषाल यांनी गायले आहे. नीता अंबांनी यांनी परिपूर्ण मुद्राने सर्वांवर जादू केली.

दरम्यान, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चे 31 मार्च रोजी उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी नवी दालनं खुली होतील असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील कलाकारांसह बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. गुरुवारी, रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, नीता अंबानी सांस्कृतिक केंद्रात पूजा केली. पूजेनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एक स्वप्न साकार झालं. आपला सांस्कृतिक वारसा बहरेल असे ठिकाण आपल्याला निर्माण करायचे आहे.

हे सांस्कृतिक केंद्र हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे. यात डायमंड बॉक्स, स्टुडिओ थिएटर, आर्ट हाऊस आणि सार्वजनिक कला अशा अनेक गोष्टी आहेत. अभ्यागतांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी हे सांस्कृतिक केंद्र खास तयार करण्यात आले आहे.

AMACC लाँच प्रसंगी नीता अंबानी म्हणाल्या, 'कल्चरल सेंटरला मिळत असलेला पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. हे जगातील सर्वोत्तम सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. सर्व कला आणि कलाकारांचे येथे स्वागत आहे. येथे लहान शहरे आणि दूरच्या भागातील तरुणांनाही त्यांची कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. मला आशा आहे की जगातील सर्वोत्तम शो येथे येतील.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी याप्रसंगी म्हणाले, 'मुंबईसह देशासाठी हे कलेचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. येथे मोठे शो होतील. मला आशा आहे की भारतीय त्यांच्या संपूर्ण कलात्मकतेने मूळ शो तयार करू शकतील.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात केवळ बॉलीवूड आणि हॉलीवूड कलाकारच सहभागी झाले नाहीत, तर क्रीडा, राजकारण, व्यवसाय आणि आध्यात्मिक जगतातील सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, निक जोनास, उद्योगपती आनंद महिंद्रा, सुपरस्टार रजनीकांत, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, दिया मिर्झा करिना कपुर, सैफ अली खान अशा अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यात श्रद्धा कपूर आणि श्रेया घोषाल यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग होता.

एम्मा चेंबरलेन, गिगी हदीद यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, स्मृती इराणी यांसारखे राजकारणी आणि सद्गुरु जग्गी वासुदेव, स्वामी नारायण संप्रदायाचे राधानाथ स्वामी, रमेश भाई ओझा, स्वामी गोपाल यांसारखे अध्यात्मिक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT