NEET-UG Paper Leak Dainik Gomantak
देश

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

NEET-UG Paper Leak: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET (UG) २०२६ महाघोटाळ्याच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) हाती आज एक सर्वात मोठे आणि महत्त्वाचे यश आले आहे.

Sameer Amunekar

देशभरात गाजत असलेल्या NEET-UG २०२६ महाघोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बॉटनीची (वनस्पतीशास्त्र) प्रोफेसर मनीषा मंधारे हिला सीबीआयने आज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर केले. सीबीआयचा युक्तिवाद आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष सीबीआय न्यायाधीशांनी मनीषाला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे आता शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनीषा मंधारे ही मूळची महाराष्ट्रातील पुणे येथील एका नामांकित संस्थेत बॉटनीची प्राध्यापक आहे. पेपर लीक झाल्यानंतर ती फरार झाली होती. सीबीआयने तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका हॉटेलवर छापा टाकून तिला अटक केली होती. अटक केल्यानंतर तिला दिल्लीत आणण्यात आले, जिथे सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी केली. या प्राथमिक चौकशीनंतर आज तिला विशेष न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले.

लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप

सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, मनीषा मंधारे हिची 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) ने विषयतज्ज्ञ (Expert) म्हणून नियुक्ती केली होती. या नियुक्तीमुळे तिची नीट परीक्षेच्या बॉटनी आणि जूलॉजीच्या (प्राणीशास्त्र) प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट आणि गुप्त पोहोच होती.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मनीषाने आपल्या पदाचा गैरवापर करून परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका लीक केल्या. या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात तिने गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा संशय आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये संस्थेतील अंतर्गत लोक, दलाल (बिचौलिए) आणि श्रीमंत उमेदवारांची साखळी सक्रिय होती. शिक्षा मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयने १२ मे २०२६ रोजी या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT