Mehbooba Mufti
Mehbooba Mufti Dainik Gomantak
देश

'मशिदी पाडून भारत विश्वगुरु होऊ शकतो...', Gyanvapi प्रकरणावरुन मुफ्तींचा हल्लाबोल

दैनिक गोमन्तक

Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मेहबूबा म्हणाल्या की, 'न्यायालयेच त्यांच्या निर्णयाचा आदर करत नाहीत. भाजपच्या राजवटीत मशिदी पाडण्यात देश विश्वगुरु होऊ शकतो.'

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'माझ्या मते न्यायालय स्वतःच्याच आदेशाची अवज्ञा करत आहे. 1947 पूर्वीची सर्व प्रार्थनास्थळे यथास्थित राहतील, असे कायद्यात नमूद आहे. मग ते मंदिर असो, मशीद असो किंवा इतर कोणत्याही धर्माचे श्रद्धास्थान असो. यासंबंधीचा कायदा संसदेत (Parliament) पारित करण्यात आला होता. परंतु आता न्यायालयच (Court) त्याचे पालन करत नाही.'

दुसरीकडे, महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष वळवल्याचा आरोपही मुफ्तींनी केला आहे. मेहबूबा पुढे म्हणाल्या, "भाजपकडे तरुणांसाठी नोकऱ्या नाहीत. लोक दिवसेंदिवस गरीब होत चालले आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. दोनच उद्योगपती देशात श्रीमंत होत चालले आहेत. सामान्य माणूस दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. मात्र भाजपला (BJP) हिंदू-मुस्लिम कार्ड वापरुन आपल्या हेतू साध्य करायचा आहे. त्यांना मशीदी पाडून भारताला विश्वगुरु बनवायचे आहे.'' निकाल आल्यानंतरही मेहबुबा मुफ्तींनी आपल्या ट्विटर हँडलवरुन भाजपवर हल्लाबोल केला.

तसेच, वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी मुस्लीम पक्षाचा अर्ज फेटाळून लावला. ज्ञानवापी प्रकरणात सुनावणी होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. दुसरीकडे मात्र, हिंदू पक्ष याला आपला विजय मानत आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडे, अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे.

शिवाय, मुफ्ती यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "कोणालाही बोलण्याची परवानगी नाही... आवाज दाबला जात आहे. जनतेचा पैसा पीआरमध्ये खर्च करण्याऐवजी उपराज्यपालांनी त्यांच्या सेवेसाठी खर्च करावा. गुज्जर, बकरवाल, मुस्लीम, काश्मिरी पंडित, डोग्रा छळ होत आहे. ठराविक सरकारी कर्मचाऱ्यांचीच जम्मूला बदली करण्यात आली असून बाकीचे कर्मचारी बदलीसाठी संघर्ष करत आहेत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT