Mehbooba Mufti: 'इतक्या टोकाला जातील...', BJP चा मेहबुबा मुफ्तींवर हल्लाबोल

BJP Slams Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला.
 Mehbooba Mufti
Mehbooba MuftiDainik Gomantak

BJP Slams Mehbooba Mufti on Controversial Statement: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला. सत्ताधारी भाजपचा अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला. यातच आता मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री निर्मल सिंह म्हणाले, “ रामनाथ कोविंद दलित समाजातून आले आणि राष्ट्रपती बनले. गरीब आणि दलितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी राष्ट्रपतींवर टिका करताना मेहबुबा इतक्या टोकाला जातील, असे वाटले नव्हते. यापेक्षा खालची पातळी असूच शकत नाही.''

दरम्यान, ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान आणि सरकारला त्या केवळ शिव्या देतात. निवडणूक आयोग असो, न्यायालये असो यांच्यावर त्या सातत्याने टिका करतात. दुसरीकडे मात्र, पाकिस्तान (Pakistan) आणि अतिरेक्यांबद्दल त्या काहीही बोलत नाहीत. ज्या अजेंडासाठी त्या राजकारण करत राहिल्या त्यामध्येही त्या अपयशी ठरल्या.''

 Mehbooba Mufti
Amartya Sen यांनी बंग विभूषण पुरस्कार स्वीकारण्यास दिला नकार, 'दुसऱ्याला द्या'

मेहबुबा मुफ्ती यांनी रामनाथ कोविंद यांच्यावर असा निशाणा साधला

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी ट्विट करत म्हटले की, “मग ते कलम 370 असो, नागरिकत्व कायदा असो किंवा अल्पसंख्याकांना किंवा दलितांना लक्ष्य करणे असो. राम नाथ कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेच्या नावाखाली भाजपचा राजकीय अजेंडा नेहमीच पूर्ण केला."

 Mehbooba Mufti
दम असेल तर ताजमहलचं मंदिर बनवून दाखवा - मेहबूबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, 'माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी असा एक वारसा मागे ठेवला आहे, जिथे भारतीय संविधानाला अनेकदा चिरडले गेले.' राष्ट्रपतींच्या निरोपाच्या दिवशी मेहबुबा मुफ्तींच्या अशा वक्तृत्वामुळे राजकारण आणखी तापू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com