monkeypox Dainik Gomantak
देश

मंकीपॉक्सचा धोका वाढला; केंद्राकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

दैनिक गोमन्तक

अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, केंद्र सरकारने रोगाच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 31 मे पर्यंत, भारतात मंकीपॉक्सचे एकही प्रकरण आढळलेले नाही. मात्र केंद्र सरकारने याबाबत सतर्कता दाखवत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Increased risk of monkeypox; New guidelines issued by the Center )

मार्गदर्शक सूचनांनुसार संशयिताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवले जातील. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीचे 21 दिवस निरीक्षण केले जाईल.संसर्गजन्य कालावधीत रुग्ण किंवा त्यांच्या दूषित सामग्रीशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज निरीक्षण केले जाईल.

मांकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला तर त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. हे नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम नेटवर्क अंतर्गत पाठविले जातील. परंतु, तोपर्यंत अशी प्रकरणे संशयास्पद मानली पाहिजेत. ज्यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ज्याचा गेल्या 21 दिवसांत मांकीपॉक्सचे रूग्ण असलेल्या देशांमध्ये प्रवास झाला आहे.

यासोबतच ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर रूग्णाला हॉस्पिटलच्या आयसोलेशन रूममध्ये किंवा घरी वेगळ्या खोलीत ठेवण्यात येईल. अशा रूग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालावा लागेल.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. याशिवाय जर तुम्ही मांकीपॉक्स आढळलेल्या भागात जाऊन आला असाल किंवा तुमचा मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीसोबत संपर्क आला असेतर तर याची आरोग्यमित्राला द्या.

जगभरात मे महिन्याच्या सुरूवातीपासून मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. आतापर्यंत हा आजार जगभरातील 20 देशांमध्ये पसरला आहे. मंकीपॉक्सचा अचानक उद्रेक होणे आणि त्याचा प्रसार जगासाठी धोक्याची घंटा आहे, कारण तो जवळच्या व्यक्तीच्या संपर्कातूनही पसरतो, अशी माहिती जागितक आरोग्य संघटनेने दिली आहे.

या देशांमध्ये आढळले मंकीपॉक्सचे रुग्ण

मंकीपॉक्स मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये रुग्णांची नोंद झाली आहे. या मध्ये गॅबॉन, लायबेरिया, नायजेरिया, काँगो रिपब्लिक आणि सिएरा लिओन, यूएसए, युनायटेड किंगडम, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, इस्रायल, स्वित्झर्लंड इ. सारख्या स्थानिक नसलेल्या देशांमध्ये प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT