नायजेरियामध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी

20 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार - WHO
monkeypox
monkeypoxDainik Gomantak
Published on
Updated on

सुमारे दोन ते तीन वर्षे कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यात मानवी जीवन पूर्वपदावर येत आहे. जगातील बहूतांशी देशात कोरोना संक्रमण थांबले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावानंतर मंकीपॉक्स या आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कारण जगातील अनेक राष्ट्रात मंकीपॉक्सने धुमाकूळ घातला आहे. याच मंकीपॉक्स रोगाचा पहिला बळी नायजेरियामध्ये गेला आहे. (First victim of monkeypox in Nigeria)

मिळालेल्या माहितीनुसार नायजेरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने रविवारी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या वर्षी 66 संशयित रुग्ण सापडले होते. त्यामधील 21 रुग्ण मंकीपॉक्सचे असल्याची नोंद झाली आहे. नायजेरियासह पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत या रोगाचा प्रसार झाला आहे. नायजेरियात मंकीपॉक्समुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

monkeypox
पाकिस्तानात मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार? 'पण...'

नायजेरियामध्ये सप्टेंबर 2017 पासून मंकीपॉक्स रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेला नाही. पण याची काही प्रकरणं समोर येत आहेत. सीडीसीनं म्हटलं आहे की, 2017 पासून 36 पैकी 22 राज्यांमध्ये किमान 247 प्रकरण आढळली आहेत. यामध्ये मृत्यू दर 3.6 टक्के आहे. युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने इतर अनेक देशांमध्येही चिंता वाढली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नं सांगितलं आहे की, 20 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाला आहे. जगभरात या रोगाचे सुमारे 200 रुग्ण आढळले आहेत. आफ्रिकेबाहेर मंकीपॉक्सचे इतके रुग्ण यापूर्वी कधीच आढळले नव्हते.

काय आहे मंकीपॉक्स ?

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस आहे जो प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरलेला विषाणू आहे. ज्याची लक्षणे स्मॉलपॉक्सच्या रूग्णांमध्ये आढळतात, मंकीपॉक्स हा सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणून उदयास आला आहे. मंकीपॉक्स प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो, अनेकदा उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या सान्निध्यात, आणि शहरी भागात वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. प्राण्यांच्या यजमानांमध्ये उंदीर आणि मानवेतर प्राइमेट्सचा समावेश होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com