NCERT Dainik Gomantak
देश

NCERT ने हटवला बाबरी विध्वंसाचा संदर्भ; विद्यार्थी शिकणार राम मंदिर आंदोलनाचा धडा

Babri Demolition: 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित काही भाग 12वीच्या NCERT पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत.

Manish Jadhav

NCERT Removed Babri Demolition From 12th Political Science Textbook: अयोध्या वाद आणि रामजन्मभूमी आंदोलनाबाबत आता विद्यार्थ्यांना सविस्तरपणे शिकवले जाणार आहे. एनसीईआरटी 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना रामजन्मभूमी आंदोलनाविषयी सविस्तरपणे शिकवले जाईल. 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील अयोध्या वादावरील एका अध्यायातील काही भाग, जो 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या मंदिराला परवानगी देण्याच्या निर्णयाचा एक घटक होता, त्यात सुधारणा करण्यात आली आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमासह नवीन पुस्तके महिनाभरात येण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित काही भाग 12वीच्या NCERT पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत. NCERT ने इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशीद, हिंदुत्वाचे राजकारण, 2002 ची गुजरात दंगल आणि अल्पसंख्यांकांशी संबंधित अनेक संदर्भ काढून टाकले आहेत. बाबरी मशीद आणि हिंदुत्वाच्या राजकारणाचा उल्लेखही प्रकरणातून काढून टाकण्यात आला आहे.

आधी काय होतं?

जुन्या अभ्यासक्रमात पहिल्या परिच्छेदात लिहिले होते - अनेक घटनांमुळे अयोध्येतील वादग्रस्त वास्तू (बाबरी मशीद म्हणून ओळखली जाते) डिसेंबर 1992 मध्ये पाडण्यात आली. या घटनेने देशाच्या राजकारणात अनेक बदलांची सुरुवात झाली आणि भारतीय राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या स्वरुपाविषयी वादविवाद तीव्र झाले. यातून देशात भाजपचा उदय झाला आणि हिंदुत्वाचे राजकारण तीव्र झाले.

काय बदलले गेले?

दरम्यान, आता हा परिच्छेद बदलला आहे. आता लिहिले आहे की - अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरावरुन जुना कायदेशीर आणि राजकीय वाद भारताच्या राजकारणावर प्रभाव टाकू लागला, ज्याने अनेक राजकीय बदलांना जन्म दिला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवरील चर्चेची दिशा बदलून रामजन्मभूमी मंदिर आंदोलन हा केंद्रीय मुद्दा बनला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानंतर (9 नोव्हेंबर 2019 रोजी घोषित) या बदलांचा परिणाम असा झाला की, अयोध्येत राम मंदिर बांधले गेले.

गुजरात दंगलीचा संदर्भही काढला

गुजरात दंगलीचा संदर्भ पाचव्या प्रकरणातील लोकशाही अधिकारातून काढून टाकण्यात आला आहे. आधी लिहिले होते – या पानावरील न्यूज कोलाजमध्ये तुम्हाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) चा संदर्भ दिसला का? हे संदर्भ मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरुकता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी संघर्ष दर्शवतो. अनेक भागात मानवाधिकार उल्लंघनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, उदाहरणार्थ- गुजरात दंगलीला पब्लिक नोटीसमध्ये आणण्यात आले. आता यात बदल करण्यात आला की – देशभरातील मानवाधिकार उल्लंघनाची अनेक प्रकरणे सार्वजनिक निदर्शनास आणली गेली.

12वीचे विद्यार्थी आता या गोष्टी वाचणार नाहीत

पाचव्या प्रकरणातील ‘अंडरस्टँडिंग मार्जिनलायझेशन’ मध्ये मुस्लिमांना विकासाच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे. आत्तापर्यंत लिहिले होते- 2011 च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येच्या 14.2% मुस्लिम आहेत आणि आज देशातील इतर समुदायांच्या तुलनेत हा समुदाय उपेक्षित मानला जातो.

आता असे लिहिले आहे - 2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येच्या 14.2% मुस्लिम आहेत. ते सामाजिक-आर्थिक विकासात तुलनेने कमजोर आहेत, म्हणून तो उपेक्षित समुदाय राहिला. एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी सांगितले की, आम्ही काही गोष्टी अपडेट केल्या आहेत, जो संदर्भ हटवण्याची गरज होती तोच हटवण्यात आला आहे. यास आपण अभ्यासक्रमात बदल म्हणू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT