Chhattisgarh  Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: छत्तीसगडमध्‍ये नक्षलाची दहशत, दंतेवाडामध्‍ये बस पेटवली

पोलिस व सुरक्षा दलाच्‍या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली आहे.

दैनिक गोमन्तक

Chhattisgarh: छत्तीसगडमध्‍ये नक्षलग्रस्‍त जिल्‍हा दंतेवाडा येथे पुन्‍हा एकदा नक्षलवाद्यांनी धुमाकुळ घातला आहे. दंतेवाडा येथे बस पेटवून देत आपले अस्‍तित्‍व दाखविण्‍याची धडपड नक्षलींनी केली आहे.या बस मध्ये २१ प्रवाशी होते.  नक्षलवाद्यांनी कोणत्याही प्रवाशाला इजा केलेली नाही.

हे संपूर्ण प्रकरण दंतेवाडा जिल्ह्यातील घोटिया चौकाजवळचे आहे. हा परिसर मालेवाही आणि बोदली सीआरपीएफ कॅम्प दरम्यान आहे. 20-25 नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगण्यात आले, त्यानंतर बस पेटवण्यात आली. या आगीनंतर नजीकच्या सीआरपीएफ कॅम्पना सतर्क करण्यात आले आहे.

  • विजापूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

विजापूरमधील गांगलूर पोलीस ठाण्याचा परिसर नक्षलग्रस्त आहे. शनिवारी सकाळी पोलिस नक्षलविरोधी मोहिमेत कोरचोली, सावनार, तोडकाच्या दिशेने निघाले. या टीममध्ये DRG, STF आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 85 व्या बटालियनचे कर्मचारी होते. सावनारजवळील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT