Nuclear Ballistic Submarine Dainik Gomantak
देश

INS Aridhaman: भारताची ताकद वाढणार! अणुशक्तीवर चालणारी तिसरी पाणबुडी लवकरच ताफ्यात दाखल होणार; नौदल प्रमुखांची मोठी घोषणा VIDEO

Nuclear Ballistic Submarine: स्वदेशी अणुशक्तीवर चालणारी तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी 'INS अरिधमान' लवकरच नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे.

Manish Jadhav

Nuclear Ballistic Submarine: स्वदेशी अणुशक्तीवर चालणारी तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी 'INS अरिधमान' लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी मंगळवारी (2 नोव्हेंबर) माहिती दिली. INS अरिधमान सेवेत दाखल झाली की, भारताकडे (India) समुद्रात कार्यान्वित असलेल्या तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या होतील. सध्या या पाणबुडीची चाचणी सुरु आहे. मोठ्या अणुशक्ती असलेल्या नौदलाच्या तुलनेत भारताचा SSBN ताफा लहान असला तरी, या नवीन समावेशामुळे देशाची सागरी सुरक्षा क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.

2029 पर्यंत 4 राफेल जेट्स नौदल ताफ्यात दाखल होणार

ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महत्त्वाची माहिती दिली. भारतीय नौदलाला (Indian Navy) 2029 पर्यंत चार राफेल जेट्सची पहिली डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्यासाठी असलेला प्रोजेक्ट 75 इंडिया अंतिम टप्प्यात आहे. याबाबत लवकरच औपचारिक करार देखील केला जाईल, अशी माहितीही ॲडमिरल त्रिपाठी यांनी दिली.

'ऑपरेशन सिंदूर' आणि नौदलाची भूमिका

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय नौदलाच्या भूमिकेबद्दल माध्यमांना माहिती देताना ॲडमिरल त्रिपाठी म्हणाले की, नौदलाच्या आक्रमक धोरणाने आणि युद्धनौकांच्या जलद तैनातीमुळे पाकिस्तानला त्यांच्या युद्धनौका पोर्ट्समध्येच ठेवण्यास भाग पाडले. त्यांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्वरित आक्रमक भूमिका आणि कॅरियर बॅटल ग्रुपची तैनाती केल्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाला त्यांच्या बंदरामध्ये किनारपट्टीजवळ राहणे अनिवार्य झाले.

भारतीय नौदलाला आणखी मजबूती

पुढे ॲडमिरल त्रिपाठी यांनी गेल्या वर्षभरातील नौदलाच्या प्रगतीचाही आढावा घेतला. "पंतप्रधानांनी 15 जानेवारी रोजी ट्राय-शिप कमिशनिंग इव्हेंटमध्ये नौदलात समाविष्ट केलेली एक पाणबुडी आम्ही सेवेत दाखल केली. गेल्या नौदल दिनापासून आतापर्यंत आम्ही 12 युद्धनौका समाविष्ट केल्या आहेत," अशी माहिती ॲडमिरल त्रिपाठी दिली. तसेच, ऑगस्टमध्ये समाविष्ट केलेली INS उदयगिरी ही आमची 100 वी स्वदेशी युद्धनौका होती. हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी आम्ही 'शिपबिल्डिंगच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण' या शीर्षकाखाली एक सेमिनारही आयोजित केला.

मोठे भांडवली प्रकल्प आणि करार

भारतीय नौदलाचे स्वदेशीकरण आणि आधुनिकीकरण मोठ्या वेगाने सुरु असल्याचे ॲडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले. विविध शिपयार्ड्स, डीपीएसयू, पीएसयू आणि खासगी शिपयार्ड्समध्ये 51 नौदल प्लॅटफॉर्म्सची बांधणी सुरु आहे. 24 डिसेंबरपासून आम्हाला 94 भांडवली प्रकरणांसाठी मंजुरी मिळाली आहे, ज्यांची किंमत सुमारे 1,27,554 कोटी रुपये आहे. यात 47 युद्धनौका आणि 120 वेगवान इंटरसेप्टर क्राफ्टचा समावेश आहे.

"आम्ही जवळपास 84624 कोटी रुपयांच्या 83 भांडवली प्रकरणांसाठी करार केले आहेत, ज्यात सुमारे 7000 कोटी रुपयांच्या 46 तातडीच्या खरेदी प्रकरणांचा समावेश आहे," असे त्रिपाटी पुढे म्हणाले. नौदलाने 25 एप्रिल रोजी 26 राफेल विमानांसाठी करार केला. या करारात पाच वर्षांसाठी कामगिरी-आधारित लॉजिस्टिक्स समाविष्ट आहे. 2029 मध्ये आम्हाला चार विमानांची पहिली डिलिव्हरली मिळेल अशी अपेक्षा शेवटी त्रिपाटी यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 2nd ODI: हिटमॅन रचणार इतिहास? 41 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठणार नवा टप्पा; सचिन-विराटच्या स्पेशल क्लबमध्ये होणार सामील

Goa ZP Election: 'कमळा शिवाय पर्याय ना!', दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा, निवडणूक प्रचारासाठी CM सावंत स्वतः मैदानात

Goa Live News: सेंट फ्रान्सिस झेवियर सणाची तयारी पूर्ण!

Goa Politics: 'युती'च्या तोंडावर 'यादी'चा बॉम्ब! "चर्चा सुरू असताना यादी जाहीर करणं धक्कादायक", काँग्रेसच्या भूमिकेवर मनोज परब नाराज

Viral Video: 'अखेरची' सफारी ठरली असती, पिसाळलेल्या हत्तीने गाडीचा केला पाठलाग, पर्यटकांची झाली पळापळ, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT