Navjyot Singh Sidhu Dainik Gomantak
देश

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला जिल्हा न्यायालयात पत्करली शरणागती

नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

दैनिक गोमन्तक

रोड रेज प्रकरणी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आत्मसमर्पण केले आहे. 1988 च्या या खटल्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ हवा असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र, सिद्धूंनी आज दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले.

दरम्यान, सिद्धू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवडे वाढवण्याच्या विनंतीला वकिलांनी विरोध केला होता. ते म्हणाले की, न्यायालयाने आता निकाल दिला आला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा 3-4 आठवड्यांची मुदत देण्याची काही आवश्यकता नाही. मात्र, वेळ देण्याबाबत विचार करणे हा न्यायालयाचा विवेक आहे. न्यायमूर्ती खानविलकर यांनी सिद्धू यांच्या वकिलाला अर्ज दाखल करण्यास सांगितले आणि खंडपीठाच्या स्थापनेसाठी सीजेआयसमोर नमूद केले.

मात्र, आत्मसमर्पणाला मुदतवाढ देण्याची चर्चा सुरु होण्यापूर्वीच सिद्धू आज (शुक्रवार, 20 मे) पटियाला हाऊस कोर्टात आत्मसमर्पण करणार असल्याची बातमी आली होती. शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे (Congress) काही नेते आणि समर्थक नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. 1988 च्या 'रोड रेज' प्रकरणात सिद्धूला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT